आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियात भारतीय दूतावासावर रासायनिक हल्ल्याचा कट? 10 देशांच्या दूतावास परिसरात संशयास्पद पार्सल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात असलेल्या भारतासह इतर देशांच्या दूतावास परिसरात बुधवारी संशयास्पद पार्सल सापडले आहेत. यासंदर्भातील माहिती मिळताच अग्निशन, रुग्णावाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेलबर्नमध्ये असलेल्या 10 आंतरराष्ट्रीय दूतावास परिसरात हे संशयास्पद पार्सल आले होते. त्यांचा पत्ता लागला नसल्याने वेळीच पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन दलाला सतर्क करण्यात आले आहे.


ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी जारी केलेल्या माहितीप्रमाणे, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक प्रत्येक दूतावासात जाऊन संशयास्पद पॅकेजचची चाचपणी करत आहेत. हे पॅकेज कुणी आणले आणि त्यामध्ये नेमके काय याचा शोध घेतला जात आहे. सद्यस्थितीला यासंदर्भात काहीही सांगता येणार नाही. महानगर अग्निशमन दलाने सांगितले, की ते फेडरल पोलिसांना सहकार्य करत आहेत. सर्वच पार्सल मेलबर्न येथील आंतरराष्ट्रीय दूतावास परिसरात सापडले आहेत. या ठिकाणी, ब्रिटन, दक्षिण कोरिया, जर्मनी, इटली, स्वित्झरलंड, पाकिस्तान, ग्रीस, आणि इंडोनेशियाचे सुद्धा दूतावास आहेत. आपत्ती व्यवस्थापन दलाने केमिकल विरोधी सूट आणि बॉम्बशोध सामुग्रीसह इमारतींमध्ये प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...