आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव SUV ने फुटपाथवर झोपणाऱ्या चिमुकल्यांना चिरडले, तिघांचा मृत्यू; संतप्त जमावाने ड्रायव्हरचा जीव घेतला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या राजधानीत एका भरधाव एसयूव्हीने फुटपाथवर झोपलेल्या चिमुकल्यांना चिरडले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशीरा घडलेल्या या घटनेत 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तर एक मुलगा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर स्थानिकांनी आक्रोश करत ड्रायव्हरला घेरले. यानंतर सर्वांनी मिळून इतकी मारहाण केली की त्याचा जीव गेला. कारमध्ये बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा जमावाने मारहाण केली. तो सध्या गंभीर असून रुग्णालयात उपचार घेत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण्यातील अगमकुआ पार्कच्या शेजारी असलेल्या फुटपाथवर मंगळवारी रात्री काही लोक झोपले होते. त्याच रात्री 2 वाजेच्या सुमारास एक भरधाव कार अनियंत्रित होऊन त्यांच्यावर उलटली. आरडा-ओरड आणि कार आदळण्याच्या आवाजाने स्थानिक घटनास्थळी गोळा झाले आणि त्यांनी कारमध्ये असलेल्या दोघांना बेदम मारहाण केली. यात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी असून सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्यांचे वय 9 ते 15 वर्षे दरम्यान होते. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांच्या भरपाईची घोषणा केली आहे.