आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडियामुळे लोकांचा स्क्रीन टाइम वाढला आणि वाचनासाठीचा वेळ झपाट्याने कमी झाला. हे असे काही होईल याची सामान्य वाचकांना कल्पना नव्हती. माहितीचा स्त्रोत अचानक कोसळण्यास सुरुवात झाली असली तरी सार्वजनिक वाचनालयांनी सामूहिक वाचनाची आवड पहिल्यापासून उचलून धरलेली आहे, तसे पुस्तकवेड्यांनीही वेगवेगळया उपक्रमातून हे पुस्तकप्रेम अबाधित ठेवलेले आहे.
सोलापुरातील लीलाताई शिंत्रे यांनी १९७२ साली मिराशी यांच्या घरी सदाफुली ही लायब्ररी सुरू केली. प्रत्येकीने चांगली दर्जेदार दोन पुस्तके विकत आणायची आणि वर्षभर त्या पुस्तकांची देवाणघेवाण करून ती सगळी पुस्तके वाचायची व त्यावर चर्चा करायची असे या उपक्रमाचे स्वरूप होते. दर महिन्याला पुस्तकांचे आदानप्रदान आणि चर्चा होते. वाचन चळवळ जोपासणाऱ्या या लायब्ररीमध्ये सुरुवातीला २५ महिला होत्या. दरवर्षी नवनवीन पुस्तकांचे वाचन व चर्चा होत गेली. या उपक्रमाला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. सुवर्ण महोत्सव सिंगी मळा येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष शिंत्रे, पुणे उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सोलापुरातील डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, डॉ. विद्या देशपांडे, डॉ. क्षमा वळसंगकर व डॉ. सुलेखा आराध्ये यांनाही आमंत्रित केले होते. त्यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सोलापुरातील सिंगी मळा येथे झाला. प्रास्ताविक डॉ. सुलेखा आराध्ये यांनी केले. सूत्रसंचालन अंजली नानल तर आभार विद्या झांबरे यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. सुनीता आराध्ये, डॉ. मनीषा आंधळगावकर, सीमा किणीकर, उषा शहा, स्मिता वढावकर, विजया झांबरे, प्रा. डिंगरे, जयश्री पटवर्धन, मीना देशपांडे, वर्षा भावार्थी, स्नेहल सहस्रबुद्धे, कल्पना कस्तुरे, मीना सुभाष, सरिता मोकाशी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.