आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुजूकीने सादर केले इग्निसची फेसलिफ्ट व्हर्जन; फ्रंट बंपर आणि ग्रिलमध्ये बदल करुन दिला एसयूव्हीसारखा लूक

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • IgnisFacelift ला देशभरातील नेक्सा शोरूमवर बुक करता येईल
  • नवीन Ignis दोन कलर ऑप्शन- लुसेंट ऑरेंज आणि ब्लू कलर

नरेंद्र जिझोतिया

ऑटो डेस्क- ऑटो एक्सपो 2020 मध्ये काल मारुती सुजूकीमध्ये पॉपुलर प्रीमियम हॅचबॅक मारुती सुजुकी इग्निसचे फेसलिफ्ट व्हर्जन शोकेस करण्यात आले. कंपनीने याच्या एक्सटीरियरमध्ये अनेक बदल केले आहेत. शोमध्ये कंपनीने या गाडीच्या किमतीबाबत अद्याप सांगितले नाही, पण नेक्सा शोरूमवर याला बूक करता येईल. जानकारांनी सांगितल्यानुसार 4.79 लाख ते 7.14 लाखांच्या जुन्या प्राइस बँडपेक्षा 50 हजार रुपयांनी महाग असू शकते.

काय आहे बदल ?

फ्रंट बंपर आणि ग्रिल, सिटिंग पोझीशन, रूफ रेल आणि रिअर स्पॉइलरमध्ये बदल करुन सुजूकीने या गाडीला एसयूवीसारखा टफ लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल देण्यात आले आहेत, जे कंपनीचीच कॉम्पॅक्ट एसयूसे विटारा ब्रेजाशी मिळते-जुळते आहे. यासोबच यात नवीन हेडलँप्स देण्यात आले आहेत, ज्यात एलईडीचा वापर करण्यात आला आहे. ही गाडी दोन कलर ऑप्शन- लुसेंट ऑरेंज आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध असेल.

एक्सटीरिअर

या गाडीला एसयूवीसारख्या फील देण्यासाठी कंपनीने याच्या फ्रंट ग्रिलमध्ये बदल केले आहेत. यात यू-शेप ग्रिल आणि बंपरवर ब्लॅक ग्रिलचा वापर करण्यात आला आहे. परंतू, गाड़ीच्या डायमेंशनमध्ये कोणताच बदल झाला नाही.

इंटीरिअर

कंपनीने डुअल टोन कलर कॉम्बीनेशन दिले आहे, ज्यात ब्लॅक आणि ग्रे कलर सामील आहेत. सीट्सच्या पॅटर्नमध्ये बदल करुन गाडीला आधीपेक्षा जास्त प्रीमियम लूक देण्यात आलाय. गाडीत 17.78 सेमीचे स्मार्टप्ले स्टूडियो सिस्टीम आहे. यात क्लाउड कनेक्टिविटी फीचर आहे, ज्याच्या मदतीने लाइव ट्रॅफिक, व्हॉइस रिक्गनायझेशन, ड्रायवर सेफ्टी अलर्ट आणि व्हीकल इंफॉर्मेंशनसारख्या माहिती मिळतात.

इंजिन आणि ट्रांसमिशन

यात बीएस 6 कंप्लेंट 1.2 लीटर व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन  मिळेल. यामुळे चांगला कंफर्टेबल ड्राइविंग एक्सपीरियंस मिळेल, असा दावा कंपनीचा आहे. नवीन इग्निस मॅनुअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रांसमिशनमध्ये उपलब्ध असेल. कंपनी यात दोन नवीन कस्टमायजेशन ऑप्शनदेखील देईल.

0