आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्रा Thar ला टक्कर देण्यासाठी Suzuki ने आणली ऑल न्यू Jimny, फोटोंमध्ये पाहा फीचर्स...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - जगातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Suzuki ने ऑल न्यू Jimny गतवर्षी जागतिक स्तरावर लॉन्च केली होती. आता ही कार फिलिपाइन्समध्ये सादर करण्यात आली असून लवकरच भारतात सुद्धा लॉन्च होत आहे. परंतु, भारतात याची किंमत किती राहील यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. सोबतच, फिलिपाइन्समध्ये जी कार लॉन्च करण्यात आली त्यापेक्षा छोटी आणि स्वस्त स्पोर्टी कार भारतात उतरवली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, Suzuki Jimny  चे लुक्स आणि फीचर्स पाहिले असता याची थेट महिंद्रा थार (Mahindra Thar) शी टक्क मानली जात आहे. या दोन्ही कार कथितरित्या Mercedes Benz G-Wagon पासून प्रेरित आहेत.


चार व्हॅरिएंटमध्ये होणार लॉन्च, क्लायमेट कंट्रोलसारखे फीचर्स...
Jimny मध्ये क्लायमेट कंट्रोलसारखे हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. यात पेट्रोल इंजिनचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. सोबतच, फोर व्हील ड्रायव्हिंग सिस्टिम राहणार आहे. Suzuki फिलिपाइन्सने शुक्रवारी ही कार लॉन्च केली. परंतु, त्यांनी देखील अद्याप किमतीचा खुलासा केला नाही. ही कार सर्वप्रथम सप्टेंबर 2018 मध्ये सर्वप्रथम फिलिपाइन्समध्येच सादर करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...