आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाचा संयम संपताेय, खबरदार! नवीन वर्षात राज्यभरात पुन्हा पेटणार रान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद - दूध दरवाढीसाठी करण्यात अालेल्या अांदाेलनानंतर पुन्हा एकदा बळीराजा व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून अांदाेलनाच्या तयारीत अाहेत. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २५ जानेवारीपासून दुष्काळप्रश्नी अाक्रमकपणे अांदाेलन करण्याचा निर्णय घेतला अाहे. तर दुसरीकडे अखिल भारतीय किसान सभाही शेतकऱ्यांच्या प्रश्नी तीव्र रेल व रास्ता राेकाे करणार असल्याने नवीन वर्षात पुन्हा रान पेटण्याची चिन्हे अाहेत. 

 

शेतकऱ्यांचा संयम अाता संपताे अाहे. सरकारने वारंवार बळीराजाला खाेटी अाणि फसवी अाश्वासने दिली अाहेत. दुष्काळाने शेतकरी पिचला असतानाच त्याला अाता सरकारी जाचाचाही सामना करावा लागताेय. दूध दरवाढ करण्याचे सरकारने मान्य केल्यानंतर राज्यातील बळीराजाने १ जून २०१७ पासून सुरू केलेले अांदाेलन मागे घेतले हाेते. यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचीही घाेषणा करण्यात अाली. ही घाेषणाही फसवी निघाली अाहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे अद्यापही जमा नाहीत. पीक विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांची फसवणूक केली अाहे. फायनान्स, मायक्राे फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांना गावात येऊन त्रास देत पैशांचा तगादा लावत असल्याने शेतकऱ्यांना गावं साेडावी लागत असल्याने गावं अाेस पडताहेत. 
- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना

 

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे तसेच गावचे अर्थकारण पुरते बिघडले अाहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे काेलमडली अाहे. सरकारी अधिकारी शेतकऱ्यांची कामे करत नसल्याने शेतकऱ्यांमधील संताप अाणखी वाढताेय. सरकारच्या अाश्वासनानंतर शेतकऱ्यांनी राज्यभरात सुरू केलेली विविध अांदाेलने मागे घेतली हाेती. परंतु, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली अाहे. नाशवंत शेतीमाल हमीभाव धोरण, शेतकरी आत्महत्या,जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नी ८ जानेवारी रोजी किसान सभेच्या वतीने राज्यभर रास्ता व रेल रोको करत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. ८-९ जानेवारीच्या अखिल भारतीय संपाला किसान सभा सक्रिय पाठिंबा देणार आहे. पुण्यातील राज्य काैन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला अाहे. 
- डाॅ. अजित नवले राज्य सरचिटणीस, किसान सभा 

 

यामुळे बळीराजा सरकारवर नाराज 
कर्जमाफीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा नाही. केंद्राच्या चुकीच्या दुष्काळ संहितेमुळे शेकडो गावे दुष्काळाच्या यादीतून अन्यायकारक पद्धतीने वगळण्यात आलीत. 

 

अांदाेलनाची दिशा ठरली, निर्णय पक्का 
- पहिल्या टप्प्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना २५ जानेवारीपासून राज्यातील सर्वच जिल्हा कचेऱ्यांवर माेर्चे काढणार. 
- अखिल भारतीय किसान सभा ८ जानेवारीला राज्यात तीव्र रेल व रास्ता राेकाे करणार. परभणी येथे राज्यव्यापी दुष्काळी परिषद घेणार. 

बातम्या आणखी आहेत...