आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला खिंडार, प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी राजू शेट्टींकडे सोपवला राजीनामा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगलाच धक्का बसला आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टींचे खंदे समर्थक आणि स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रवीकांत तुपकर भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचीही भेट घेतली, त्यामुळेच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांणा उधाण आले आहे.राजू शेट्टींकडे सोपवला राजीनामा
रवीकांत तुपकर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा राजू शेट्टी यांना पाठवला आहे. त्यात "मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजुर करावा" असे म्हटले आहे. दरम्यान, रवीकांत तुपकर यांचा राजीनामा अद्याप मला प्राप्त झालेला नाही. तो माझ्याकडे आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करेन, असे स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...