आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Swami Chakrapani Praise The Decision Of Zaira Wasim , He Said, 'Hindu Actresses Should Get Inspiration From Her'

जायरा वसीमच्या निर्णयाची प्रशंसा करून स्वामी चक्रपाणी म्हणाले, 'हिंदू अभिनेत्रींनी प्रेरणा घेतली पाहिजे...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : जून 2019 मध्ये अभिनेत्री जायरा वसीमने सोशल मीडियावर एक पोस्ट करून बॉलिवूड आणि चित्रपट सोडण्याचा आपला निर्णय सांगितला होता. पोस्टमध्ये जायराने चित्रपटांमुळे धर्मापासून आपण दूर जात असल्याचे सांगितले होते. आता स्वामी चक्रपाणीने या प्रकरणी एक ट्वीट करून, बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्रींवर निशाणा साधला आहे. 

 

स्वामी चक्रपाणीने केले ट्वीट... 
अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणीने ट्वीट केले आहे, "धार्मिक आस्थेसाठी चित्रपट अभिनेत्री जायरा वसीमने चित्रपटांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला, प्रशंसनीय, हिंदू अभिनेत्रीनीदेखील जायराकडून प्रेरणा घ्यावी - स्वामी चक्रपाणी.  

 

जायरावर भडकली रवीना... 
जायराच्या या निर्णयामुळे रवीना टंडनने तिच्या विचारांची निंदा केली. अभिनेत्री रवीना टंडनने आपल्या ट्विटर अकाउंटवर रविवारी लिहिले, ''याने काहीही फरक पडत नाही की, केवळ दोन चित्रओपात करणारी लोक बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी कृतज्ञता व्यक्त करत नाहीत. ज्याने त्यांना सर्वकाही दिले. चांगले झाले असते जर तिने सन्मानाने इंडस्ट्री सोडली असती आणि आपले रिग्रेसिव विचार आपल्याकडेच ठेवले असते.''

बातम्या आणखी आहेत...