आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चराचरांत साचले पाणी : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ बनणार मार्गदर्शक पर्यटन केंद्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भूमी,जल, वन, प्राणी,  ऊर्जा इत्यादी नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनासाठी  मार्गदर्शन पर्यटन केंद्र उभारले जात आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या पुढाकारातून जोमाने कामही सुरू आहे. मराठवाडा नेहमी दुष्काळाने होरपळत आहे. या दुष्काळी भागात गाव पातळीवर जल व्यवस्थापन, वनाचे आच्छादन केल्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही. हे करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकाेनातून विद्यापीठ परिसरामध्ये मृद व जलसंधारण कामांचे उद्घाटन दि.१४ मे रोजी  अनुराधा पौडवाल, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले हाेते. अनेक संस्थांच्या मदतीने पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यासाठी  डाेंगरावर असे चर खाेदण्यात आले. या चरांमध्ये पावसाचे पाणी मुरत आहे. 

ही कामे झाली :  पाझर साठवण तलाव, जलस्राेताची किरकोळ दुरुस्ती, शिवनेरी बंधारा, वनराई बंधारा, दोन शेततळी, अठरा डीप सीसीटी, एकोणीस बॉक्स, माती बंधाऱ्यातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, नाला सरळीकरण अशा अनेक  कामे आजपर्यंत झाली. 


असा असेल  विद्यापीठ परिसर
स्वाराती मराठवाडा विद्यापीठ हे मुलांसाठी सहलीचे केंद्र बनेल.  आहे. जैवविविधता, औषधी वनस्पती उद्यान, सर्पोद्यान  विकसित करण्यात येणार आहे. विद्यापीठात भूमापक यंत्र, भूगर्भ शास्त्रातील खडकांचे नमुने असतील.


> २२,६८३ घनमीटर खोदकाम विद्यापीठ परिससरात


> ०२ कोटी लिटर पेक्षा जास्त पाणी साठणार.


> १० हेक्टरमध्ये वनीकरण विभागाच्या सहकार्याने जैवविविधता उद्यान.


> ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत २५ हजार सागवान वृक्ष रोपांची लागवड व संवर्धन हाेणार. 


> २५०० रोपटे लावून जैवविविधता उद्यानासाठी तीन वर्षे संवर्धन हाेणार.


 

बातम्या आणखी आहेत...