Home | Sports | Cricket | Off The Field | swami vivekanand motivates vvs laxman in his life

व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला स्वामी विवेकानंदांकडून मिळाली होती प्रेरणा, आत्मकथेत सांगितले अनेक किस्से

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 22, 2018, 05:26 PM IST

या टेस्ट मॅचमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना 223 रन बनवले होते, पण दक्षिण अफ्रीका 244 रनावरच ऑल आउट झाली होती.

 • swami vivekanand motivates vvs laxman in his life

  स्पोर्ट्स डेस्क- भारताच्या आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजापैकी एक असलेल्या व्ही.व्ही.एस. लक्ष्मणसाठी 22 नोव्हेंबर हा खास दिवस आहे. कारण त्याचे आत्मचरित्र 281 अँड बियाँड प्रकाशित होत आहेय यात त्याने अनेक असे खुलासे केले आहेत जे तुम्हाला माहीतही नसतील. या प्रकाशन सोहळ्यात अनेक क्रिकेटपटू येणार आहेत. कार्यक्रमात कॅामेंटेटर हर्षा भोगले लक्ष्मनला प्रश्न विचारेल.

  स्वामी विवेकानंदांकडून लक्ष्मणने कशी प्रेरणा घेतली होती, याचा उल्लेख त्याने या पुस्तकात केला आहे. लक्ष्मणने 134 टेस्ट मॅचमध्ये 45.97 च्या सरासरीने 8781 रन केले आहेत. यात 17 शतके आणि 56 अर्धशतकांचा समावेश आहे.

  >> 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात अहमदाबादेत लक्ष्मनने पहिले अर्धशतक बनवले होते. लक्ष्मणने पुस्तकात लिहीले की, मॅचच्या आधी त्याच्या वडिलांनी त्याला स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक 'दस स्पेक' भेट दिले होते. त्याने सांगितले की, त्यावेळी मी हे पुस्तक थोडेच वाचले पण तरीही त्या पुस्तकाने मला खूप प्रेरणा दीली. त्या इंनिंगमध्ये लक्ष्मणने नाबाद 50 रन केले होते.

  >> लक्ष्मणने पुस्तकात ऑस्ट्रेलिया विरूद्ध 1998 मध्ये खेळलेल्या एेतिहासीक टेस्ट मॅचचीही आठवण लिहिली आहे. त्यात त्याने 281 रन केले होते. लक्ष्मनने खुलासा केला की, या मॅचच्या आधी त्याला प्रॅक्टिस सेशनमध्येही घेतले नव्हते. या मॅचमध्ये तो राखीव खेळाडू होता. पण एेनवेळी त्याला खेळवण्यात आले होते. सराव केलेला नसतानाही त्याने 281 रन केले होते.

  >> याप्रकारचे अनेक खुलासे व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने त्याच्या 281 अँड बियाँड या पुस्तकात केले आहेत. पुस्तकाचे प्रकाशन आज म्हणजेच 22 नोव्हेंबरला संध्याकाळी मुंबईत होणार आहे.

Trending