आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामकृष्ण परमहंस यांचे परम शिष्य स्वामी विवेकानंद यांची रविवार 12 जानेवारी रोजी जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म महासभेत भाषण केले होते. या भाषणानंतर ते जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांनी रामकृष्ण परमहंस मिशनची स्थापना केली. स्वामीजींच्या विविध प्रसंगांमध्ये सुखी जीवन जगण्याचे सूत्र दडलेले आहेत. या सूत्रांचा अवलंब करून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. या संदर्भात स्वामी विवेकानंद यांचा एक प्रसंग अत्यंत प्रचलित आहे. येथे जाणून घ्या हा प्रसंग... चर्चित कथेनुसार, एके दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमात एक तरुण आला. तो खूप दुःखी दिसत होता. त्याने स्वामीजींसमोर दुःख सांगितले- 'मी जीवनात खूप आहे, खूप मेहनत करतो परंतु कधीही यशस्वी होत नाही.' स्वामीजींना विचारले की, देवाने मला असे नशीब का दिले? मी सुशिक्षित आणि मेहनती असूनही यशस्वी का नाही? # स्वामीजींना त्या तरुणाची समस्या लक्षात आली. त्यावेळी स्वामीजींकडे एक पाळीव कुत्रा होता. त्यांनी तरुणाला सांगितले की, तू या कुत्र्याला थोडेसे फिरवून परत ये. त्यानंतर मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो. # तरुण आश्चर्यचकित झाला, तरीही कुत्र्याला घेऊन गेला. कुत्र्याला फिरवून तरुण परत आला आणि स्वामीजींनी पाहिले की तरुणाच्या चेहऱ्यावर चमक आणि स्मितहास्य होते तर कुत्रा खूप थकलेला होता. स्वामीजींनी तरुणाला विचारले की, कुत्रा एवढा थकलेला दिसत आहे आणि तू मात्र उत्साही दिसतोयस. # तरुणाने सांगितले, मी तर सरळ आपल्या मार्गावरून चालत होतो परंतु हा कुत्रा गल्लीतील सर्व कुत्र्यांमागे धावायचा आणि भांडण करून परत माझ्याकडे यायचा. आम्ही दोघांनी एक सामान रस्ता पार केला परंतु या कुत्र्याने माझ्यापेक्षा जास्त धावपळ केली आणि तो थकला. # स्वामीजी हसत म्हणाले की, हेच तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. तुझे लक्ष्य तुझ्या जवळपासच आहे. ते जास्त दूर नाही परंतु तू लक्ष्यापर्यंत पोहोचायचे सोडून इतर लोकांच्या मागे धावत राहतो आणि आपल्या लक्ष्यापासून दूर जातो.
बहुतांश लोक इतरांच्या चुका शोधात राहतात आणि यशावर जळतात. आपले थोडेसे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि अहंकारात इतरांना महत्त्व देत नाहीत. याच विचारांमध्ये स्वतःचा अमूल्य वेळ आणि क्षमता दोन्ही गमावून बसतात आणि जीवन एक संघर्ष बनून राहते. या प्रसंगाची शिकवण अशी आहे की, इतरांशी स्पर्धा करू नये आणि आपले लक्ष्य इतरांकडे पाहून नाही तर स्वतःच निच्छित करावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.