आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ चांगला-वाईट कसाही असो, व्यक्तीने फक्त चांगले काम करत राहावे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकता येथे झाला होता. त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंगातून आपल्याला सुखी आणि यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. येथे जणूं घ्या, असाच एक प्रसंग ज्यामध्ये कर्माचे महत्त्व सांगण्यात आले आहे...


> एका महिला स्वामी विवेकानंद यांना म्हणाली, स्वामीजी काही दिवसांपासून माझा एक डोळा सारखा फडफडत आहे, काहीतरी अशुभ घडणार असे मला वाटते. कृपया एखादा उपाय सांगावा ज्यामुळे हा अपशकुन टळेल.


> महिलेचे शब्द ऐकून स्वामीजी म्हणाले, देवी माझ्या दृष्टीने काहीच शुभ आणि अशुभ नाही. जीवनात चांगल्या आणि वाईट दोन्ही घटना घडत असतात. लोक आपल्या विचारानुसार त्या घटनांना शुभ-अशुभ मानतात.


> त्यानंतर महिला म्हणाली, स्वामीजी माझ्या शेजारचे कुटुंब नेहमी आनंदात असते आणि माझ्या घरात काही न काही अशुभ घडतच राहते.


> स्वामी विवेकानंद म्हणाले शुभ आणि अशुभ विचारांचेच फळ आहे. कोणतीही अशी गोष्ट नाही, जी फक्त शुभ किंवा फक्त अशुभ म्हटली जाऊ शकते.


> जी गोष्ट आज शुभ आहे तीच उद्या अशुभ होऊ शकते. जी गोष्ट एखाद्यासाठी शुभ असते तीच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ असते. हे सर्वकाही परिस्थितीवर निर्भर करते.


> महिलेने पुन्हा विचारले, असे कसे होऊ शकते की एक गोष्ट एकासाठी शुभ आणि दुसऱ्यासाठी अशुभ.


> स्वामीजींनी उत्तर दिले, एक कुंभार मडके तयार करून वाळवण्यासाठी ठेवतो आणि कडक उन्हाची इच्छा व्यक्त करतो. त्याचवेळी दुसरीकडे एखादा शेतकरी पाऊस पडावा अशी इच्छा व्यक्त करतो, ज्यामुळे त्याची शेती चांगली व्हावी.


> या स्थितीमध्ये ऊन आणि पाऊस एकासाठी शुभ आणि दुसऱ्यासाठी अशुभ आहे. यामुळे आपण शुभ-अशुभ याचा विचार करू नये. याउलट नेहमी चांगले काम करत राहावे.


> स्वामी विवेकानंद यांचे उत्तर ऐकून महिला म्हणाली आता मी फक्त माझ्या कामाकडे जास्त लक्ष देईल.

बातम्या आणखी आहेत...