आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच जिज्ञासू वृत्तीचे हाेते. संगीत, खेळ यांसह विविध उपक्रमात ते हिरीरीने सामील हाेत. अध्यात्माविषयी विशेष आेढ असल्यामुळे खेळता खेळता ते ध्यान करीत आणि तासन््तास त्यामध्ये रमून जात. त्यांची नेहमीच रामायण, महाभारतातील कथा त्यांना एेकवत असे, तेदेखील अत्यानंदाने श्रवण करीत. ज्ञानार्जन आणि नवनव्या गाेष्टी समजून घेण्यासाठी देशभर भ्रमण करीत. एकदा ते बनारसमध्ये हाेते. गंगास्नानंतर दुर्गामातेच्या मंदिरात गेले. तेथे दर्शनानंतर जेव्हा प्रसाद घेऊन बाहेर पडत हाेते तेव्हा तेथील साऱ्या वानरांनी त्यांना घेरले. त्यांच्या हातातील प्रसाद हिसकावून घेण्यासाठी वानरे त्यांच्या दिशेने चालू लागली. वानरांची टाेळी आपल्याकडे येत असल्याचे पाहून स्वामी विवेकानंद घाबरले आणि स्वत:चा बचाव करण्यासाठी पळू लागले, मात्र वानरांनी त्यांचा पिच्छा पुरवला. तेथे असलेल्या एका वृद्ध संन्याशाने हा प्रसंग पाहिला. त्यांनी स्वामी विवेकानंदांना राेखले आणि म्हणाले, पळू नकाेस... उलट त्यांचा सामना कर आणि पाहा काय हाेते ते. वृद्ध संन्याशाचे म्हणणे एेकून स्वामीजी थांबले. त्यांनी जीव घट्ट करून धीर धरला आणि माघारी परतून वानरांच्या दिशेने चालू लागले. स्वामीजी आपल्याकडे येत असल्याचे पाहून वानरे मागे परतू लागली. थाेड्या वेळाने पळून गेली. अनेक वर्षांनंतर एका सभेत त्यांनी या घटनेचा उल्लेख केला. या घटनेतून मला एक शिकायला मिळाले की, अडचणी-समस्या येत असतातच, मात्र त्यापासून पळ काढण्याएेवजी त्यांचा सामना केल्यानेच संकट दूर हाेते. त्यानंतर मी काेणत्याही संकटापासून विचलित झालाे नाही. न घाबरता, धैर्याने अडचणीच्या प्रसंगांना ताेंड दिले. एक गाेष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुमच्या मार्गात काेणतीही समस्या येत नसेल तर ताे मार्ग तुम्हाला यशाच्या दिशेने नक्कीच घेऊन जाऊ शकत नाही.
शिकवण : आपण सारेच एखाद्या कामात अडचणी वाढल्या तर ते सुरू करण्यापूर्वीच त्यापासून पळ काढताे. खरे तर संकटांचा धैर्याने मुकाबला केल्यानेच यश मिळू शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.