आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही घर बदलतो, पण बदलणा-या भाषेला घाबरतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: जगभरात जेथे भाषेसोबत प्रयोग झाले, बदलत्या काळासोबत भाषा प्रवाही राहिल्या, त्या भाषा टिकल्या, वाढल्या. उलट ज्यांनी बदलणं नाकारलं त्या लुप्त झाल्या याकडे प्रसिद्ध गीतकार, संगीतकार स्वानंद किरकिरे यांनी लक्ष वेधले. आपण घर बदलतो, राहणीमान बदलतो, पण भाषेला प्रवाहासोबत बदलू देत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 'भाषा एक खोज' या सत्रात दैनिक भास्कर डिजिटलचे संपादक अनुज खरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

'औरंगाबादकरांना नमस्कार...' या शब्दांत किरकिरे यांनी संवादाला सुरुवात केली. चित्रपट गीतांनी भाषेला प्रवाही ठेवले. बोलीभाषेत जे बदलले ते चित्रपटाच्या भाषेतही बदलल्याचे त्यांनी उदाहरणांसह मांडले. व्हॅक्युम क्लीनर विक्रेता ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार, संगीतकार यांनी त्यांच्या कविता, गाणी याच्या निमित्ताने शब्द, भाषेवर संवाद साधला. 'हजारो ख्वाइशे'मधील 'बावरा मन..' या गाण्यापासून 'लगे रहो मुन्नाभाई'मधील 'बंदे में है दम...' द्वारे भाईच्या शब्दातील गांधीजी, 'थ्री इडिएट्स'मधील 'ऑल इज वेल' ही कॉलेज युवकांची भाषा यामागील प्रक्रिया त्यांनी सांगितली. पंधरा दिवस झगडल्यावर ते शब्द सापडल्याचे सांगितले. 

ते म्हणाले, 'कला असली तरी शेवटी चित्रपट हा व्यवसाय आहे आणि तो यशस्वी होण्यासाठी गाण्यांची हूक लाइन हा सध्या आग्रहाचा मुद्दा बनला आहे. पण त्यात गैर काही नाही. गीतकाराचे विचार हीच हूक लाइन असते अनेकदा. मात्र लोकांना मूर्ख बनवण्यासाठी जे केलं जातं ते गैर आहे. आपल्या देशात चित्रपट गीतलेखनाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नाही. चित्रपटांच्या मागणीनुसार गीतकार, कवी त्यांच्या प्रतिभेनुसार गीते लिहून देतात. मात्र भविष्यात अशी संस्था असावी यासाठी प्रयत्न करणार अाहे.' 

 

'एनएसडी'चे सौंदर्य आणि जीवनाची 'एनएसडी' 
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी, त्यांच्या विभिन्न संस्कृती, विचार, दृष्टिकोन, त्यातून मिळालेली विभिन्न शिकवण, तेथील वातावरण हेच आपल्या कलेचं उगमस्थान असल्याचं ते म्हणाले. एनएसडीने आपल्याला अनेक कलाकार दिले. अर्थात त्यांना तेथे जाता आलं नाही. पण जीवनाच्या एनएसडीमधून शिकणारेही असंख्य कलाकार आपल्याकडे आहेत, असे ते म्हणाले. या क्षेत्रात शिकू इच्छिणाऱ्या तरुणांनी मनातील भीती घालवून प्रयत्न करणं गरजेचं आहे असे ते म्हणाले. 

 

किरकिरेंचे स्वानंदी बोल... 
जगण्याशी जोडलेली कला सच्ची 
भाषेवर प्रेम करतो, पण ती बदलू देत नाही 
प्रवाही भाषा टिकल्या, बाकीच्या संपल्या 
बावरं मन... माझ्या जगण्याचं प्रतिबिंब 
बंदे में है दम... मुन्नाभाईच्या भाषेचे आव्हान 
ऑल इज वेल.. कॉलेज तरुणांची भाषा 
रागाने परिस्थिती बदलत नाही हे कळाले 
स्वतःला बदलण्याची सुरुवात केली 
इंटरनेटवरील एक व्यंगचित्र बघून 'मुर्गी क्या जाने' सुचले 
 
या गाण्यांनी आणली बहार... 
औरंगाबादकरांच्या फर्माइशवर किरकिरेंनी ही गाणी गाऊन संवाद सत्रात बहार आणली... 
ओरी चिरय्या.. बावरा मन... 
वो किसी रेल सी ...  बेहेती हवा से था वो... 
'भाषा एक खोज' सत्रात स्वानंद किरकिरे यांनी वेधले लक्ष 

बातम्या आणखी आहेत...