आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडी किंवा रोमँटिक नव्हे हॉरर चित्रपट करतोय स्वप्नील जोशी, हा आहे चित्रपट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका हॉरर चित्रपटात झळकणार आहे. स्वप्नीलने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. 'बळी' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट 2020मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपट 'लपाछपी' फेम विशाल फुरिया यांनी केले आहे. 'बळी' या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडते आहे, असे त्यातून प्रतीत होते.

'जीसिम्स'चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा काय असेल आणि यामध्ये स्वप्नील जोशी कोणत्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...