आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Swara Bhaskar And Many Bollywood Celebs Reaction On Naseeruddin Shah Controversial Statement

नसीरुद्दीन शहांना अभिनेत्री स्वरा भास्करचा पाठिंबा, म्हणाली -हे आमचे घर आहे, येथून आम्हाला कोण बाहेर काढणार, रिचा चड्ढा आणि आशुतोष राणा यांनीही दिली नसीरची साथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अलीकडेच नसीरुद्दीन शहा त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी भारतातील सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. एका मुलाखतीत नसीर बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलिस अधिका-याची हत्या केली होती. या घटनेवर शहा यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'आता गाईचा जीव माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाचा झाला आहे. समाजात विष पसरले आहे. या परिस्थितीची मला भूप भीती वाटते. अचानक जमावाने माझ्या मुलांना घेरले आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम अशा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल, ", अशा शब्दांत देशातील परिस्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

 

नसीर यांच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमध्ये दोन गट निर्माण झाले. एक गट नसीर यांना पाठिंबा दर्शवत आहेत, तर एक गट त्यांच्या विचारांना विरोध दर्शवत आहे. 

 

नसीरुद्दीन यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या स्वरा भास्कर आणि रिचा चड्ढा...
अभिनेत्री स्वरा भास्करने नसीरुद्दीन शहा यांना पाठिंबा दर्शवला आहे. स्वराने ट्वीटरवर लिहिले, 'हे आमचे घर आहे आणि यातून कोण आम्हाला बाहेर काढू शकतो. मी तुमच्यासोबत आहे नसीरुद्दीन सर...' तर गायिका रिचा चड्ढा हिनेदेखील एका यूजरच्या ट्वीटला कोट करत लिहिले, 'त्यांना नेमके असे का वाटते, हे त्यांना कुणी विचारले का नाही? हा त्यांचा अनुभव आहे. असाच अनुभव अनेकांचाही असू शकेल.  तुम्हा एकाद्याच्या भावनांना सेन्सॉर करु शकता का? तुम्ही यासाठी त्यांना लाजिरवाणे करु शकत नाहीत. त्यांच्या वक्तव्यावर येणा-या प्रतिक्रिया त्यांनी उचलून धरलेला मुद्दा योग्य असल्याचे सिद्ध करत आहे.'

 

आशुतोष राणा म्हणाले -सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा हक्क आहे...
अभिनेता आशुतोष राणाने नसीरुद्दीन शहा यांच्या वक्तव्याला समर्थन दर्शवत म्हटले की, या देशात प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा हक्क आहे. जर कुणी आपले मत नोंदवत असेल, तर त्याला सोशल ट्रोल करायला नको, कारण प्रत्येकाला स्वतःचे म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. बलरामपूर येथे एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या आशुतोष यांना यावेळी प्रश्न विचारला गेला की, तुम्हाला भारतात राहण्याची भीती वाटते का? यावर ते म्हणाले, भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती ही देशभक्त आहे. भविष्यात जर कधी मला असे वाटले तर यावर भाष्य करायला देवाने मला कंठ दिला आहे. गोष्ट मांडण्याची शैली दिली आहे. याचे उत्तर त्या दिवशी नक्की ऐकायला मिळे. 

 

रेसलर योगेश्वर दत्तने नसीरुद्दीन यांच्या वक्तव्यावर साधला निशाणा...
योगेश्वर दत्तने नसीरुद्दीन शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात एकामागून एक ट्वीट करत निशाणा साधला आहे. योगेश्वरने लिहिले, आज या देशात ज्या लोकांना आपल्या मुलांविषयी भीती वाटते, त्या लोकांची ती भीती तेव्हा कुठे होती, #NaseeruddinShah जी, जेव्हा 1984 चे दंगे झाले, 1993 मध्ये मुंबईत बॉम्ब ब्लास्ट झाले, 26/11 चा हल्ला झाला?... इतकेच नाही तर योगेश्वरने आणकी एक ट्वीट करुन लिहिले,''एका दहशतवादी संघटनेने भारत आणि बांग्लादेशातील नागरिकांचे अपहरण करुन बांग्लादेशींना त्यांचा धर्म विचारुन सोडून दिले आणि इतर 39 भारतीयांची हत्या केली. तेव्हा तम्हाला राग का आला नाही? दहशतवादी याकूब मेननच्या फाशीच्या दया याचिकेवर सही करताना तुम्हाला भीती वाटली नाही.''


येथे बघा ट्वीट...

 

“Hamara ghar hai, kaun Nikaal sakta hai hamey yahaan sey!!!!” More power to you #NaseeruddinShah sir ❣️ https://t.co/fmsG52PIE4

— Swara Bhasker (@ReallySwara) December 20, 2018

Why not ask him why he feels this way? It’s his truth, his experience. And that of so many others. Can you censor his feelings ? You can’t shame him for it. The responses to his comment are proving the point he’s making. Better to be an angry patriot than a fake nationalist I say https://t.co/kOBWUHen2y

— TheRichaChadha (@RichaChadha) December 21, 2018

पर उपदेश कुशल बहुतेरे!!
आप शायद विराट कोहली को “बुरे व्यवहार” के लिए कह रहे थे! ये क्या है जनाब !
अपने प्रिय अभिनेताओं की छवि को इस तरह खंडित होते देखना दुखद है! #NaseeruddinShah @imVkohli https://t.co/FVmbxe41gK

— Malini Awasthi (@maliniawasthi) December 20, 2018

आज इस देश में जिन लोगों को अपने बच्चों के लिए डर लग रहा है, वो डर तब कहां था #NaseeruddinShah जी जब 1984 के दंगे हुए, जब 1993 में मुंबई में बंब ब्लास्ट हुए, 26/11 का हमला हुआ?

— Yogeshwar Dutt (@DuttYogi) December 21, 2018

एक आतंकवादी संगठन ने भारत और बांग्लादेश के नागरिकों का अपहरण कर लिया और बाद में बांग्लादेशियों का धर्म देखकर छोड़ दिया, बाकी के सभी 39 भारतीयों को मार दिया, तब आपको गुस्सा नहीं आया?आतंकी याकूब मेमन की फांसी की दया याचिका पर साइन करते हुए आपको डर नहीं लगा?

— Yogeshwar Dutt (@DuttYogi) December 21, 2018

 

बातम्या आणखी आहेत...