Home | Gossip | Swara Bhaskar expressed the sadness about Twinkle Sharma's death, trollers got angry, saying - 'It was too late'

ट्विंकल शर्मा मर्डरबद्दल स्वरा भास्करने ट्विटरवर व्यक्त केले दुःख, तर ट्रोलर्सला आला राग, म्हणाले - 'खूप उशिरा जाग आली' 

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 11, 2019, 05:50 PM IST

'खूप उशीर केलात मॅडम येता येता' - एक युजर... 

 • Swara Bhaskar expressed the sadness about Twinkle Sharma's death, trollers got angry, saying - 'It was too late'

  बॉलिवूड डेस्क : अलीगडच्या टप्पल भागामध्ये दोन वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या झाली होती. त्यामुळे सर्वानाच धक्का बसला होता. ट्विंकल 30 मेला घराबहेर खेळताना बेपत्ता झाली होती. 2 जूनजूनला मुलीचा मृतदेह सापडला. या घटनेवर बॉलिवूड सेलेब्सनेही राग व्यक्त केला होता. अनेकांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. घटना घडल्याच्या अनेक दिवसानंतर अभिनेत्री स्वरा भास्करनेदेखील रोष व्यक्त केला. त्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.

  काय लिहिले स्वराने ?...
  स्वराने ट्विटरवर लिहिले, 'रशियातून ब्रेकनंतर परतले आहे, सोशल मीडियापासूनही ब्रेक घेतला होता! अलीगडमध्ये दोन वर्षांच्या ट्विंकल शर्माची झालेली हत्या खूपच भयावह आहे, आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी जेणेकरून असे घृणास्पद कृत्य पुन्हा घडू नये. कुटुंबासाठी मी प्रार्थना करते.'

  ट्रोलर्सने लिहिले, 'खूप उशिरा जाग आली'...
  स्वराच्या या ट्वीटनंतर तिला ट्रोल करणे सुरु झाले. लोकांनी एवढ्या उशिरा प्रतिक्रिया दिल्यामुळे तिची खूप शाळा घेतली. एका यूजरने लिहिले, 'असीफा रेप केसमध्ये प्लेकार्ड उचलणारी स्वरा, यावेळी तू असे का नाही केलेस ?' आणखी एका यूजरने लिहिले, 'खूप उशीर केलात मॅडम येता येता.' दुसऱ्याने लिहिले, 'इथेही अॅक्टिंग.'

 • Swara Bhaskar expressed the sadness about Twinkle Sharma's death, trollers got angry, saying - 'It was too late'

Trending