आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अभिनेत्रीने बीजेपी लीडरचे स्टेटमेंट पोस्ट करून दिला संघाला एक सल्ला, पण आपल्याच एका चुकीमुळे फसली, सोशल मीडिया यूजर्सने सुनावले खडे बोल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री स्वारा भास्करने बीजेपी नेता तेजस्वी सूर्याच्या ट्वीटवर रिप्लाय करत लिहिले, "किती वेळा एकाच स्टेटमेंटचे फॅक्ट चेक करावे यार!!!! हे स्टेटमेंट दुसऱ्या कुणाचे नाही तर हिंदू महासभेचे नेता एनबी खरे यांनी 1959 मध्ये लिहिलेव होते!!! लिहा वाचा संघवाल्यांनो." झाले असे की, तेजस्वी सूर्याने 2013 मध्ये ट्विटरवर एक पोस्ट लिहिली होती, "शिक्षणाने मी इंग्रज, विचारांनी अंतर्राष्ट्रीयवादी, कल्चरने मुस्लिम आणि अपघाती जन्माने एक हिंदू आहे." यावर स्वाराने आता निशाना साधला आहे.  

सोशल मीडिया यूजर्सने ऐकवले खडे बोल...
स्वारा भास्करने ट्वीट केल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स तिला खाकडे बोल ऐकवण्यात मागे नाहीत. एका यूजरने तर लिहिले, "उंबोटांसोबत मेंदूचाही जरा वापर करत जा". दुसऱ्याने तर जरा जास्तच राग व्यक्त केला आणि लिहिले, "एका नाचणारीने देशातील सर्वात जुन्या संघटनेविषयी काही व्यर्थ काहीही न बोललेलेच बरे ! तुला माहितच काय आहे संघाविषयी ? तुझे जे काम आहे त्यावरच लक्ष दिले तर ठीक राहील !" अनेक यूजर्स तर तिच्यावर ट्वीटच्या डेटमुळेच भडकले आणि त्यांनी लिहिले, "स्वतःदेखील जरा वाचले असते."

🙄🙄🙄🙏🏿 कितनी बार एक ही statement को fact check करें यार!!!! This statement was made by none other than #HinduMahasabha leader N.B. Khare in 1959!!! पढ़ लिख लो संघियों 🙏🏿🙏🏿🙏🏿https://t.co/VrW8OAWANphttps://t.co/11dcbtt1wR

— Swara Bhasker (@ReallySwara) March 27, 2019

तेजस्वी सूर्या एक वकील आहे... 
रिपोर्ट्सनुसार, तेजस्वी सूर्या कर्नाटक हायकोर्टमध्ये वकील आहे. असे म्हणाले जात आहे की, त्यांना बीजेपीने दक्षिण बंगळुरूमधून पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवले आहे. असेही सांगितले जात आहे की, ते सूर्य बासावानगुडी विधानसभेचे विधायक एल ए रविसुब्रमण्यम यांचे पुतणे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...