आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवर्ण आरक्षणामुळे रिक्त जागांच्या प्रमाणात माेठी वाढ, माहितीच नसल्याचा परिणाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश जोशी  औरंगाबाद - आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना (ईडब्ल्यूएस) नोकरी आणि शिक्षणात १०% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला असला तरी त्याचा फायदा होण्याऐवजी त्यामुळे रिक्त जागाच वाढल्या आहेत. राज्यात एकट्या अभियांत्रिकीतील ८२% जागा रिक्त असून अन्य अभ्यासक्रमांचीही हीच अवस्था आहे. लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांआधी केंद्राने २०१९ च्या पहिल्या शैक्षणिक सत्रापासूनच आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १०% आरक्षण देण्याचा कायदा केला. हे आरक्षण देताना अन्य आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून विद्यमान जागांत वाढ करण्यात आली. मात्र, वाढीव जागा आणि ईडब्ल्यूएस संवर्गाबाबत लोकांना माहितीच नसल्याने यंदा रिक्त जागांत मोठी वाढ झाली आहे.

विद्यार्थ्यांना अंधारात ठेवले

आरक्षणासाठी खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रवेशासाठी गर्दी केली. पण त्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती. ५०% शुल्क भरावे लागते याची माहिती नव्हती. यामुळे संधी असतानाही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आणि जागा रिक्त राहिल्या. सरकार याची माहिती देण्यात कमी पडले, पण शैक्षणिक संस्थांनीही याबाबत विद्यार्थ्यांना अंधारात ठेवल्याचे तंत्रशिक्षण खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
 

सवलतीचा फायदा घेण्यासाठी अटी :


डब्ल्यूएस अारक्षणासाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने पूर्वी कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाखांहून कमी असावे. ५ एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेती किंवा १ हजार चौरस फूट किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाचे घर असेल, तर लाभ नाही.राखीव १०,२४९ जागांपैकी केवळ १,८७७ भरल्या


> राज्यात सरकारी व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीच्या (बीई/बीटेक) १ लाख २७,५३७ पैकी ६१,६१४ (४८%) जागा रिक्त आहेत.


ईडब्ल्यूएससाठी राखीव १०,२४९ जागांपैकी १,८७७ भरल्या तर ८,३७२ (८२%) रिक्त राहिल्या. यामुळे अभियांत्रिकीच्या एकूण रिक्त जागांची टक्केवारी गतवर्षीच्या ४३% हून ४८% वर गेली. 


> एमई/एमटेकच्या ईडब्ल्यूएस संवर्गातील तब्बल ९४% जागा भरल्या गेल्या नाहीत. यामुळे या अभ्यासक्रमांच्या एकूण ६५% जागा रिक्त राहिल्या. गतवर्षी हे प्रमाण ५४.५% होते. 


> बीफार्मच्या एकूण जागांपैकी १८% जागा रिक्त आहेत. ईडब्ल्यूएस संवर्गातील ७७% रिक्त जागांमुळे हे प्रमाण वाढले. गतवर्षी ते प्रमाण २.११% होते. एमबीए, एमएमएस, आयटीआय आणि बीएडच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे.बातम्या आणखी आहेत...