Home | Mukt Vyaspith | swarna pushak article about business education

शिक्षणासोबत उद्योजकतेचेही मार्गदर्शन हवे

स्वर्ण पुष्पक | Update - Jan 25, 2017, 03:00 AM IST

भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टिमची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. याबाबतीत भारताचे स्थान जगातील तीन अग्रणी देशांमध्ये आहे.

  • swarna pushak article about business education
    भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टिमची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. याबाबतीत भारताचे स्थान जगातील तीन अग्रणी देशांमध्ये आहे. पण देशात मोजक्याच संस्थांमध्ये उद्योजकतेचा अभ्यासक्रम आहे, ही मूळ समस्या आहे. देशातील ७७ विद्यापीठांमध्ये उद्योजकतेचे अभ्यासक्रम आहेत. यातील बहुतांश अभ्यासक्रम आयआयटी, आयआयएमसारख्या बड्या संस्थांमध्येच आहेत. स्टार्टअप सुरू करणाऱ्या भारतीयांचा विचार केल्यास, यापैकी बहुतांश बड्या संस्थांमधील पदवीधर विद्यार्थी आहेत. शहरी आणि ग्रामीण परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना अद्याप उद्योजकता, स्टार्टअप इत्यादींविषयी काहीच माहिती नाही.

    स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत दारिद्र्य आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी अनेक सरकारी योजना सुरू झाल्या. पण सरकारी अधिकाऱ्यांना श्रीमंत करण्यापर्यंतच त्या मर्यादित राहिल्या. आता दरवर्षी १ कोटीहून अधिक तरुण रोजगार मिळवण्यास पात्र ठरत असताना त्यांच्या रोजगाराचा प्रश्न केवळ सरकारच्या भरवशावर सोडणे कठीण आहे. उद्योजकतेमुळे तरुण केवळ पैसा कमावू शकणार नाहीत तर ते इतरांनाही रोजगार मिळवून देऊ शकतात. एका अहवालानुसार, देशातील स्टार्टअपअंतर्गत ८० हजार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. प्रत्येक स्टार्टअपमध्ये सुमारे ४ ते ५ लोकांना रोजगार मिळू शकतो. मात्र भारतीय अर्थव्यवस्था उद्योजकतेवरून ओळखली जाईल तेव्हाच याचा आपल्याला जास्त फायदा होईल. मेक इन इंडियासारख्या मोहिमांचे यशही तरुणांच्या सहभागावर अवलंबून आहे. शिक्षण संस्थांमधून पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत उद्योजकतेविषयी मार्गदर्शन केल्यास ग्रामीण भागातही याविषयी जागृती निर्माण होईल. शहरी तसेच निमशहरी भागात उद्योजकतेविषयीचे लहान-मोठे अभ्यासक्रम सुरू केले तरच भारत आणि इंडियामधील दरी कमी होण्याची शक्यता आहे.
    स्वर्ण पुष्पक, 19
    एनआयटी जमशेदपूर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग

Trending