आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेजगारासाठी स्वित्झर्लंडला पसंती, भारताची आठव्या स्थानावर घसरण; क्रमवारीमध्ये अन्य देशांचीही प्रगती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जर तुम्ही परदेशात नाेकरी करण्याची याेजना आखत असाल तर तुमच्यासाठी स्वित्झर्लंड हा एक चांगला पर्याय ठरू शकताे. एचएसबीसीने परदेशातील सर्वात श्रेष्ठ देशांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षात आठव्या स्थानावर असलेला स्वित्झर्लंड देशाने यंदाच्या वर्षी सिंगापूरला पिछाडीवर टाकत पहिले स्थान पटकावले आहे. हा अहवाल १६३ ठिकाणच्या १८ हजार ५९ परदेशी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तयार करण्यात आला आहे. यामध्ये विदेशी लाेकांसाठी अव्वल ३३ देशांची यादी जाहीर करण्यात आली आहेे.


गेल्या वर्षी या यादीत ११ व्या स्थानावर असलेला भारत सात स्थान घसरून १८ व्या स्थानावर आला आहे. २०१८मध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या सिंगापूरला आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. कॅनडा तिसऱ्या आणि स्पेन चाैथ्या स्थानावर आहे. अनेक बड्या खासगी बँका, कमोडिटी ट्रेडर आणि आैषध कंपन्यांचे घर म्हणून आेळखले जाणाऱ्या स्वित्झर्लंडला तेथील विदेशी मनुष्यबळाला मिळणाऱ्या सरासरी वार्षिक वेतनाचा माेठा फायदा मिळाला आहे. स्वित्झर्लंडमध्ये परदेशी कर्मचाऱ्यांना वर्षभरात सरासरी ११५८७ डाॅलर (जवळपास ७६ लाख रुपये) वेतन मिळते. हे वेतन अव्वल ३३ देशांमध्ये देण्यात येणाऱ्या वेतनाच्या तुलनेत ४७ % जास्त आहे. वेतनाची जागतिक सरासरी ७५,९६६ डाॅलर (जवळपास ५२ लाख रुपये) आहे. परंतु चीनच्या काही शहरात तसेच दुबईमध्ये मिळणारे वेतन स्वित्झर्लंडपेक्षा जास्त आहे. स्वित्झर्लंडमध्ये काम करणाऱ्या विदेशी कर्मचाऱ्यांमधील ८२ % जणांनी त्यांच्या देशाच्या तुलनेत येथे आल्यावर त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावला असल्याचे सांगितले. ७० टक्के जणांनी आपल्या देशाच्या तुलनेत नैसर्गिक वातावरण चांगले असल्याचे सांगितले. गुन्हेगारीचे कमी प्रमाण, देशाची राजकीय आणि आर्थिक स्थिरता यामुळे परदेशी कर्मचाऱ्यांसाठी स्वित्झर्लंड हा प्रथम क्रमांकाचा देश ठरला आहे. राहणीमान, करिअरच्या संधी, काैटुंबिक जीवन अशा तीन गटांत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राहणीमानाच्या आधारावर कॅनडाला पहिले स्थान मिळाले आहे. करिअरमधील संधीमध्ये स्वित्झर्लंड सगळ्यात पुढे आहे. काैटुंबिक जीवनासाठी सिंगापूरला प्रथम स्थान आहे. सगळ्याबाबतीत सर्वात जास्त गुण मिळवत स्वित्झर्लंडने पहिले स्थान पटकावले आहे. परंतु जीवनाचा आनंद आणि मित्र परिवार जाेडण्याच्या बाबतीत या देशाची स्थिती  चांगली नाही. 

 

क्रमवारीमध्ये अन्य देशांचीही प्रगती 
स्वित्झर्लंडशिवाय अन्य देशांनीही क्रमवारीत प्रगती केली आहे. यामध्ये तुर्कस्तान आणि स्पेनचाही समावेश आहे. मागील वर्षी २२ व्या स्थानावर असलेला तुर्कस्तान आता सातव्या स्थानावर आला आहे. स्पेनने १३ स्थानावरून चाैथ्या स्थानावर झेप घेतली आहे. नाेकरीसाठी परदेशी लाेकांनी दिलेल्या संधीच्या देशांच्या क्रमवारीत स्वित्झर्लंड, सिंगापूर, कॅनडा, स्पेन, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया, तुर्कस्तान, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात, व्हिएतनाम यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...