आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sweden Airlines To Take Passengers To Earth's North Pole In 2023, Tickets Cost Rs 46 Lakh

स्वीडनची विमान कंपनी 2023 मध्ये प्रवाशांना पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर घेऊन जाणार, तिकीट 46 लाख रुपये  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम- स्वीडनमधील विमान कंपनी ओशियन स्काय 2023 मध्ये प्रवाशांना पहिल्यांदाच पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर घेऊन जाईल. विशेष म्हणजे कंपनीने याची विक्री आतापासूनच सुरू केली आहे. उत्तर ध्रुवावर जाण्यासाठी प्रवाशांना प्रती व्यक्ती 46 लाख रुपये (50 हजार पाउंड) मोजावे लागतील.
उत्तर ध्रुवावर जाण्यासाठी खास हायब्रिड विमान तयार केले जात आहे, जे 2017 मध्ये टेस्टींगदरम्यान अपयशी झाले होते. यात फाइव्ह स्टार होटलसारख्या सुविधा दिल्या जातील. हे विमान नॉर्वेच्या आइलँड समूह स्वालबारवरुन सुरू होईल. 36 तासांच्या या प्रवासात प्रवशांना 6 तास ग्राउंडवर फिरावे लागेल, त्यांना बर्फात जेवणदेखील दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...