आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिध्दी - शिवाच्या नात्याची होणार गोड सुरुवात, 'जीव झाला येडापीसा' मालिकेला वेगळे वळण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मराठी मालिका 'जीव झाला येडापीसा' ही आता एका रोमँटिक वळणावर आली आहे. अनेक गैरसमज, द्वेष, वाद – विवाद या अनेक गोष्टी शिवा – सिध्दीच्या नात्यामध्ये आल्या. टोकाची भांडण झाली पण कुठेतरी या दोघांचे नाते त्यांच्या नकळत मजबूत राहिले. नव्या वर्षात शिवा – सिद्धीच्या नात्याला वेगळी कलाटणी मिळणार आहे. या दोघांचे नाते इतक्या अडचणीनंतर देखील घट्ट राहिले मग ते सोनीच्या मध्यस्तीमुळे असो वा यशवंतरावांच्या पाठिंब्यामुळे असो. मंगल, आत्याबाई यांचे शिवा – सिद्धीला दूर करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले. सुरमारीच्या घटनेनंतर सिद्धीच्या मनात शिवाबद्दल असलेला गैरसमज दूर होऊ लागला आणि खरा शिवा तिच्यासमोर येत गेला. सत्य तिच्यासमोर आले आणि आता सिद्धीच्या मनात शिवाबद्दल आता प्रेम फुलू लागले आहे. पक्षकार्य नसून शिवा सिद्धीची घेत असलेली काळजी, तिच्यासाठी स्वयंपाक बनवला, कोणालाही सायलीबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी सिद्धीला स्वत:हून सांगितल्या, तिच्यासमोर मन मोकळे केले यामुळे कुठेतरी सिद्धीला वाटू लागले आहे की, शिवाच्या मनामध्ये असलेल्या अडी आता दूर होऊ लागल्या आहेत आणि आता ही त्यांच्या नात्याची गोड सुरुवात आहे. सिद्धीने पुढे केलेला मैत्रीचा हात शिवाने स्वीकारला. शिवाने सिद्धीसाठी पहिल्यांदा माऊथ ऑरगन वाजवणार आहे, ज्यामुळे सिद्धी खूप भाऊक होणार आहे. खरोखरच ही शिवा – सिद्धीच्या नात्याची नवीन सुरुवात असेल ? सिद्धी शिवाला तिच्या मनातील भावना कश्या पध्दतीने व्यक्त करेल ? शिवा सायलीला विसरून सिध्दीवर प्रेम करू शकेल का? हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.


सिद्धी शिवा मधील काही गोड, खास क्षण प्रेक्षकांना येत्या आठवड्यात बघायला मिळणार आहे. सिद्धी खास सत्यनारायणाच्या पूजेसाठी नैवेद्य बनवला आहे, ज्याची तारीफ काकी बरोबरच शिवा देखील करतो. पण या पूजेमध्ये मंगल काहीतरी राडा करते आणि सिद्धीवर नवीन आरोप केले जातात.