आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोड पदार्थाने नव्हे, गोड पेयाने वजन वाढते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक गोड पदार्थ खाणे टाळतात, परंतु अलीकडे झालेल्या एका अध्यननात समोर आले, गोड पदार्थ खाल्ल्याने नव्हे, तर गोड पेय पिण्याने वजन वाढते. अतिरिक्त साखर मिसळलेल्या ठोस वस्तूंनी त्या प्रमाणात वजन वाढत नाही, जेवढे लिक्विड ड्रिंक्सने वाढते. यूके आणि चायनाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या या शोधाप्रमाणे जगभरात पेय पदार्थांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. या शोधात भोजनाच्या प्रकाराने वजनावर प्रभाव पडतो का यावर शोध घेतला गेला. या शोधाप्रमाणे पाण्यात साखर घोळून पिणाऱ्यांची शुगर लेव्हल अधिक प्रमाणात वाढलेली होती, जेव्हा की साखरेचे तेवढे प्रमाण ठोस पदार्थाद्वारे दिल्याने वजनात आणि शुगर लेव्हलमध्ये काहीच फरक नव्हता.

तर नक्की काय करावे?
- नवीन शोधाप्रमाणे आपल्याला गोड खाण्याची आवड असेल तर आपल्याला लिक्विड डायटवर नियंत्रण ठेवावे लागेल. लिक्विड डायटमुळे आपले वजन लवकर वाढून शरीराचा आकार बिघडत जाईल. हल्ली कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, इतर शेक पिण्याचे ट्रेड सुरू असल्यामुळे कमी डायट असली तरी वजन काही कमी होत नाहीये म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

- कोल्डड्रिक्स आणि सोडा ड्रिंक्समध्ये शुगर अधिक प्रमाणात असते म्हणून याचे सेवन टाळावे.

- दिवसातून दोनपेक्षा अधिक वेळा चहा, कॉफीचे सेवन करू नये. हे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरेल, कारण यात कॅफिन असते.

- सरबत आणि साखर घोळून तयार केले जात असलेले ड्रिंक्स घेणे टाळा. याने आपल्या शरीरात अचानक शुगरचे प्रमाण वाढू शकते आणि याने किडनी, हार्ट आणि लिव्हरवर वाईट परिणाम होऊ शकतो. पेय पदार्थांमध्ये वरून साखर घालून पिणे टाळा.

बातम्या आणखी आहेत...