आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विफ्ट-टँकर अपघातात 4 ठार, महिला गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास स्विफ्ट कारने टँकरला मागील बाजूस धडक दिली. यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ महिला व १ पुरुषाचा समावेश आहे, तर १ महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे.

कारमधील प्रवासी सांगलीहून लग्नसमारंभाहून परत येत होते. मात्र, कार (एमएच ११ सीएच १८८९) रसायनी पोलिस ठाण्याजवळ रिसवाडी गावाजवळ येताच कारने टँकरला (एमएच ४३ बीजी ७०११) जोरदार धडक दिली. या वेळी कार पूर्णपणे टँकरमध्ये घुसली होती. या कारमधून ५ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात कारमधील चालक अक्षय नारायण कोकरे (३२), सविता लक्ष्मण मोटे (३६), राणी मोहन खर्चे (३०), रिया मोहन खर्चे (वय अंदाजे १३) हे जागीच ठार झाले, तर कारमधील एका महिलेची परिस्थिती गंभीर असल्याने तिला एमजीएम हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कार टँकरच्या मागील भागात घुसल्याने क्रेनच्या साहाय्याने कारला बाजूला करण्यात आले.