आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Swiggy Reports : Indians Demand 95 Biryani Every Minute, 128% Increase In Demand For Khichdi

प्रत्येक मिनिटाला 95 बिर्याणी मागवतात भारतीय, खिचडीच्या मागणीतही 128% वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : स्वादिष्ट जेवण आवडणाऱ्या भारतीयांची डेजर्टबद्दल पहिली पसंती अजूनही गुलाब जामच आहे. एका फूड डिलिव्हरी अॅपवर यावर्षी नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत 1769399 ऑर्डर केवळ गुलाब जामच्याच आल्या. या ऑर्डर दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या शहरांमधून आल्या. यानंतर 11.94 लाख ऑर्डर फालूदाच्या आणि 2,00,301 ऑर्डर मूग डाळीच्या हलव्याच्या आल्या. 
ही महिती ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीच्या चौथ्या वार्षिक सांख्यिकी रिपोर्टमध्ये दिली गेली आहे. रिपोर्टनुसार, देशात प्रत्येक मिनिटाला बिर्याणीच्या सरासरी 95 ऑर्डर दिल्या जातात. ऑर्डरच्या या लिस्टमध्ये बिर्याणीने तिसऱ्या वर्षीदेखील बाजी मारली आहे. मात्र 128% सोबत यावर्षी 'खिचडी' च्या ऑर्डर्समध्ये ;वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सांगितले जात आहे की, अॅपचे यूजर्स चिकन बिर्याणी जास्त पसंत करतात. 

पिझ्झामध्ये व्हेजिटेरियन टॉपिंग्सला पसंती... 


यूजर्स पिझ्झामध्ये व्हेजिटेरियन टॉपिंग्सला महत्व देतात. पिझ्झा ऑर्डरवर पनीर, ककांदा, चीज, एक्स्ट्रा चीज, मशरूम, शिमला मिरची आणि मक्का सरावात आवडत्या टॉपिंगमध्ये राहिले. इतर आवडत्या डिशेसमध्ये मेथी मलाई मटर, ढाबा डाळ विथ राइस, चपाती थाळी, गोबी मटर मसाला, दाल मखनी विथ जीरा राइस, मिनी डोसा, इडली, वड़ा-सांबर थाळी सामील आहेत. 2019 मध्ये बिर्याणी, मसाला डोसा, पनीर बटर मसाला, व्हेज फ्राइड राइस, व्हेज बिर्याणी आणि दाल मखनी सर्वात जास्त पसंत केली गेली. 

शहरांची आवड... 

  • 2019 मध्ये मुंबईमध्ये फालूदाने भरलेली स्पेशल आइसक्रीम 6 हजार वेळा ऑर्डर केली गेली.
  • चंदीगडमध्ये चॉको पाय अँड ड्रिंक 79 हजार 242 वेळा ऑर्डर केले गेले.