आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइनच्या रुग्णांवर प्रोटोकॉलनुसारच उपचार करा : आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात स्वाइन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी साथरोग नियंत्रण समितीची तातडीची बैठक गुरुवारी मंत्रालयात घेतली. स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांवर उपचारात विलंब होत असल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांना औषधोपचारानंतर २४ तासांत ताप कमी न झाल्यास तातडीने ऑसेलटॅमीवीर गोळ्या द्याव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. 


गेल्या दोन महिन्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणे, नाशिक विभागात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. राज्यात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांवर नेमके काय उपचार करावेत, याबाबत आरोग्य विभागाकडून खासगी डाॅक्टरांसाठी प्रोटोकॉल तयार करण्यात येत आहे. त्याचा अवलंब खासगी व्यावसायिकांनी करावा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले. या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी स्वाइन फ्लू, डेंग्यू आदी साथीच्या आजारांचा आढावा घेतला. राज्यात सध्या स्वाइन फ्लूचे ८९२ रुग्ण आहेत, तर ८८ रुग्णांचा मृत्यू झाला अाहे. त्यात नाशिक व पुणे विभागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. स्वाइन फ्लूच्या व्हायरसमध्ये बदल झाला नसून त्यावरील उपचारात होत असलेल्या विलंबामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचा निष्कर्ष डेथ ऑडिट समितीने काढला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी आरोग्य अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. 

 

बातम्या आणखी आहेत...