Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | swine flu symptoms and home remedies in marathi

अगदी छोट्या-छोट्या घरगुती उपायांनी पळतो स्वाइन फ्लू, हे आहेत संकेत

हेल्थ डेस्क | Update - Aug 20, 2018, 12:01 AM IST

शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने स्वाइन फ्लू होतो. योग्य वेळी उपचार केले नाहीत तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

 • swine flu symptoms and home remedies in marathi

  शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने स्वाइन फ्लू होतो. योग्य वेळी उपचार केले नाहीत तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. आपण घरच्या घरीच काही उपाय केले तर या आजारापासून बचाव करता येतो...


  हे आहेत संकेत
  श्वास घेण्यास त्रास होणे, भूक न लागणे, सतत सर्दी-पडसे होणे, घशात जळजळ आणि वेदना होणे, उलटी किंवा डायरिया स्वाइन फ्लूमुळे होऊ शकतो.


  कसा पसरतो स्वाइन फ्लू
  स्वाइन फ्लूचे व्हायरस एच-1 एन-1 जलद पसरते. ज्या व्यक्तीला हा आजार असेल त्याच्या संपर्कात आल्यास त्यालाही हा आजार होतो. हे टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.


  असा करा बचाव
  लसूण
  : रोज उपाशीपोटी दोन लसणाच्या पाकळ्या खा. हे स्वाइन फ्लूपासून बचाव करते.


  हळदीचे दूध : रोज एक ग्लास हळदीचे दूध घेतल्याने स्वाइन फ्लूपासून बचाव होतो.


  अॅलोवेरा ज्यूस : अॅलोवेेरा ज्यूस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. हे स्वाइन फ्लूपासून बचाव करते.


  तुळस : रोज सकाळी तुळशीची पाने खा. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि स्वाइन फ्लूच्या संसर्गापासून बचाव होतो.


  आवळा ज्यूस : यामधील व्हिटॅमिन-सी स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यात फायदेशीर आहे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर उपाय...

 • swine flu symptoms and home remedies in marathi

  हळद : यामध्ये करक्युमिन असते. हे स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यात प्रभावी आहे. 
  कापूर : कापराचे लहान लहान तुकडे बटाटा किंवा केळीसोबत मिसळून खा. हे महिन्यातून एकदा घेणे पुरेसे आहे. 
  लिंबू-पाणी : यामधील व्हिटॅमिन-सी स्वाइन फ्लूपासून बचाव करते. रोज सकाळी एक ग्लास लिंबू-पाणी पिणे फायदेशीर आहे. 

 • swine flu symptoms and home remedies in marathi

  कडूलिंब : रोज लिंबाची तीन-चार पान खा. हे स्वाइन फ्लूच्या संसर्गापासून बचाव करते. 
  विलायची : विलायची, तुळस आणि कापूर बारीक करून मिसळा. या मिश्रणाचा दिवसातून ४-५ वेळा सुगंध घेत राहा. हा उपाय स्वाइन फ्लूपासून बचाव करतो. 

Trending