आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Swiss Scientists Made 18 Carats Gold From Plastic, Ten Times Lighter, But Shine Just As Real Gold.

स्विस शास्त्रज्ञांनी प्लास्टिकद्वारे 18 कॅरेट साेने बनवले, दहापट हलके तरी चकाकी मात्र खऱ्या सोन्यासारखीच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रयोगशाळेत प्लास्टिकपासून निर्मित सोने. - Divya Marathi
प्रयोगशाळेत प्लास्टिकपासून निर्मित सोने.
  • स्विस विद्यापीठ ईटीएच झुरिचच्या शास्त्रज्ञांचे सोन्यावरील संशोधन सायन्स जर्नलमध्ये
  • दावा : दागिन्यात लोकप्रिय होईल

​​​​​​लंडन : पर्यावरणासाठी सर्वाधिक हानिकारक असलेल्या प्लास्टिकपासून इंधन आणि रस्ते बनवण्यासारखे अनेक प्रयोग झालेत. मात्र, जगात पहिल्यांदाच स्विस शास्त्रज्ञांनी प्लास्टिकद्वारे सोने बनवण्यात यश मिळवले आहे. प्लास्टिकच्या मॅट्रिक्सला मिश्र धातू म्हणून वापरत बनवण्यात अालेले १८ कॅरेटचे साेने वजनातही खूप हलके आहे आणि त्याची चकाकीही खऱ्या सोन्यासारखीच आहे. त्याला सहज पॉलिश करता येते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हलके असल्याने ते सोन्याची घड्याळे आणि दागिन्यात चांगलेच लोकप्रिय होईल. हे संशोधन सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

स्विस विद्यापीठ ईटीएच झुरिचमधील शास्त्रज्ञ राफेल मेजेन्गा यांनी सांगितले की, सोन्याचे जे नवीन रूप विकसित करण्यात आले आहे त्याचे वजन पारंपरिक १८ कॅरेट सोन्यापेक्षा जवळपास दहापट कमी आहे. पारंपरिक मिश्रणात सामान्यत: तीन चतुर्थांश सोने आणि चतुर्थांश तांबे असते, ज्याचे घनत्व सुमारे १५ ग्रॅम/सेंमी ३ असते. मात्र प्लास्टिकपासून बनवलेल्या सोन्याचे घनत्व फक्त १.७ ग्रॅम/सेंमी ३ आहे. तरीही ते १८ कॅरेट सोने आहे. ते बनवण्यासाठी प्रोटीन फायबर आणि एक पॉलिमर लेटेक्सचा वापर करण्यात आला आहे. याआधी सोन्याच्या नॅनोक्रिस्टलची पातळ डिस्क ठेवण्यात आली. आधी पाणी आणि नंतर अल्कोहोलद्वारे त्याचे मिश्रण बनवले. या मिश्रणाला कार्बन डायऑक्साइड वायूच्या उच्च दाबाने प्रवाहित करत त्याला घन आकारात बदलण्यात आले. संशोधकांनी पेटंटची मागणीही केली आहे.

जगातील प्रत्येक व्यक्तीवर १.२ टन घातक प्लास्टिकचे ओझे

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार पृथ्वीवर सुमारे ९.१ अब्ज टन प्लास्टिक आहे. सध्या जगाची लोकसंख्या सुमारे ७.६ अब्ज आहे. याचाच अर्थ प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला जवळपास १.२ टन प्लास्टिक आहे. मायक्रोप्लास्टिकचे घातक रसायन शरीराचे सर्वाधिक नुकसान करते. प्रत्येक जण दररोज अजाणतेपणे मायक्रोप्लास्टिकचे २०० तुकडे खातो. यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन पसरते. यामुळे व्यक्ती एखाद्या आजाराला बळी पडते. यात सर्वाधिक पोटाचे आजार आहेत.