आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Switzerland Is The Most Expensive Country In The World; India Ranks Third And Pakistan At Number One In The List Of The Cheapest Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वित्झर्लंड जगातील सर्वात महाग देश; सर्वात स्वस्त देशांच्या यादीत भारत तिसऱ्या तर पाकिस्तान पहिल्या नबंरवर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेतील लोकप्रिय बिझनेस मॅगझीन सीईओ वर्ल्डने जगातील 132 देशांचा सर्वे केला आहे

न्यूयॉर्क- फक्त 86 लाख लोकसंख्या असलेल्या यूरोपीय देश स्वित्झर्लंडचा जगातील सर्वात महाग देशांच्या यादीत पहिला नंबर लागला आहे. 53.6 लाख लोकसंख्या असलेला देश नॉर्वे या यादीत दुसऱ्या स्थानावर तर 3.63 लाख लोकसंख्या असलेला आइसलँड तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, सर्वात स्वस्त देशांच्या यादीत पाकिस्तान पहिल्या, अफगानिस्तान दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या नंबरवर आहे. अमेरिकेतील बिझनेस मॅगझीन सीईओ वर्ल्डने जगातील 132 देशांचा सर्वे करुन ही लिस्ट जारी केली आहे.


सर्वेसाठी मॅगझीनने तीन आधार ठरवले. या देशातील लोकांच्या घरांचा किराया, किराणा सामान आणि रेस्त्रामध्ये जेवणाच्या किमती. संशोधकांनी यासोबतच कपडे, टॅक्सीचे भाडे, इंटरनेटच्या किमतीनादेखील सामील केले होते. या अंतर्गत मॅगझीनने नंबरच्या आधारावर ही रँकींग केली. यात स्विट्जरलँडला सर्वात जास्त 122 नंबर मिळाले. पाकिस्तानला 21.98, तर भारताला 24.58 नंबर मिळाले.

प्रत्येक देशांच्या राजधानीचे आकडे सामील केले

हा सर्वे सर्व 132 देशांच्या राजधान्यांमध्ये केला आहे. यासाठी राजधानीमधील प्रतिष्ठीत रेस्त्रा आणि पॉश परिसरातील कॉलन्या सामील आहेत. खासबाब म्हणजे, या यादीत मोठे देश मागे असून लहान देश पुढे आहेत.

टॉप-10 सर्वात स्वस्त देश
1     पाकिस्तान    21


2    अफगानिस्तान    24


3    भारत    24


4    सीरिया     25


5    उज्बेकिस्तान    26
 
6    किर्गिस्तान   26
 
7    ट्यूनीशिया   27
 
8    वेनेजुएला    27
 
9    कोसोवो    28
 
10    जॉर्जिया    28


टॉप-10 सर्वात महाग देश
1   स्विट्जरलँड      122
 
2    नॉर्वे               101
 
3    आइसलँड          100 
 
4    जापान            83
 
5    डेनमार्क            83
 
6    बाहमास           82
 
7    लग्जमबर्ग        81
 
8    इस्रइल          81
 
9    सिंगापूर          81
 
10    साउथ कोरिया    78