आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो क्षणात झाला कोट्याधीश; तर दुसऱ्याच क्षणी झाला कंगालपती, पाहा काय आहे प्रकरण...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वित्झर्लंड- स्वित्झर्लंडमध्ये एका व्यक्तीसोबत असा काही प्रकार घडला की त्याला तो पुढील सात जन्मांपर्यंत आठवणीत राहील. अँड्रीयास बर्क्ली असे या व्यक्तीचे नाव असून एका लाइव्ह टीव्ही शोदरम्यान त्याला लॉटरी लागल्याने कोट्याधीश घोषित करण्यात आले. परंतू त्याचे नाव घोषित केल्याच्या दुसऱ्याच क्षणी त्याच्याकडून लॉटरीची रक्कम परत घेण्यात आली. या घटनेने संपूर्ण स्वित्झर्लंडमध्ये या घटनेची चर्चा सुरू झाली. एका मीडिया रिपोर्टनुसार, एसआरएफ टिव्ही चॅनलवरील 'हॅप्पी डे' नावाच्या लाइव्ह शोमध्ये अँड्रीयासला जवळपास 6,34,65,443.47 रुपयांची लॉटरी जाहीर करण्यात आली होते. 

 

फोनचे उत्तर न दिल्याने हुकली संधी
एका मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी अँड्रीयासला जर्मन पॉप स्टार आणि अॅक्टर हरबर्ट ग्रोनीमेयर यांनी विजेता घोषित केले होते. परंतू फोनचे उत्तर न दिल्याने अँड्रीयास तो विजेता होण्यापासून हुकला. 'हॅप्पी डे'च्या शोमधील लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी 8 युरोची रक्कम भरण्यात आली होती. त्यानुसार शोमध्ये जवळपास 10 स्पर्धकांना निवडण्यात आले होते. स्पर्धेच्या नियमानुसार सर्व स्पर्धकांना एका फोन कॉलचे उत्तर द्यायचे होते. त्यानंतर लॉटरीची घोषणा होणार होती. ही स्पर्धा झाल्यानंतर आयोजकांकडून 10 पैकी विजयी स्पर्धकाचे नाव जाहीर करण्यात येणार होते. परंतू स्पर्धेला उशीर झाल्याने एका लॉटरी अधिकाऱ्याने चुकीने दहाऐवजी अकरा स्पर्धकाचे नावे ड्रममध्ये टाकण्यात आले. त्यापैकी अँड्रीयास याचेही नाव होते. त्यानंतर ग्रेनमेयरने अँड्रीयासला फोन केला परंतू त्याच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे तो विजेता होण्यापासून हुकला.   

 

बातम्या आणखी आहेत...