आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Switzerland Steps Up Process To Share Banking Info Of Indians , 11 Indians Get Notices In A Day

काळ्यापैशांवर वचक : स्विस बँकेत खाते असलेल्या 11 भारतीयांना नोटीस, पाहा संपूर्ण यादी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / बर्न -  स्वित्झर्लंडने त्यांच्या बँकांमध्ये खाते असलेल्या भारतीयांच्या संदर्भात माहिती सामायिक करण्याची प्रक्रियेची गती वाढविली आहे. गेल्या आठवड्यात 12 भारतीयांना या संबंधात नोटिस देण्यात आली आहे. स्वित्झर्लंड त्यांच्या बँकेत खाते ठेवणाऱ्या ग्राहकांची गोपनीयता ठेवण्याबाबत एक मोठ्या जागतिक आर्थिक केंद्राच्या रूपात मानले जाते. पण कर चोरीच्या प्रकरणात जागतिक स्तरावरील करारानंतर गोपनीयतेची ही भिंत आता राहिली नाही. 


खातेधारकांची माहिती सामायिक करण्याबद्दल त्यांनी भारत सरकारशी करार केला आहे. इतर देशांसोबतही असे करार करण्यात आले आहेत. स्विस बँकेच्या परदेशी ग्राहकांचा माहिती सामायिक करण्यासंबंधी स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स विभागाच्या नोटिसनुसार, स्वित्झर्लंडने अलीकडेच काही देशांसोबत माहिती सामायिक करण्याची प्रक्रियेची गती वाढवली आहे. गेल्या काही आठवड्यांत भारताशी संबंधित प्रकरणांत खूप वेग आला आहे.


स्वित्झर्लंड सरकारने राजपत्राद्वारे सार्वजनिकरित्या जारी केलेल्या माहितीमध्ये ग्राहकांचे पूर्ण नाव न सांगता नावाच्या सुरुवातीचे अक्षर सांगितले आहेत. याशिवाय ग्राहकांची राष्ट्रीयता आणि त्यांची जन्मतारखेचा उल्लेख केला आहे. राजपत्रानुसार 21 मे रोजी फक्त 11 भारतीयांना नोटीत देण्यात आली आहे. यामध्ये दोन भारतीयांचे पूर्ण नाव सांगण्यात आले आहे. मे 1949 रोजी जन्मलेले कृष्ण भगवान रामचंद आणि सप्टेबंर 1972 मध्ये जन्मलेले कल्पेश हर्षद किनारीवाला अशी दोघांची नावे आहेत. पण याव्यतिरिक्त इतर कोणत्याही माहितीचा खुलासा करण्यात आला नाही. 
 

 

ज्या नावांचा समावेश करण्यात आला ती नावे पुढीलप्रमाणे 

एएसबीके  -  24 नोव्हेंबर 1944
एबीकेआय  -  9 जुलै 1944
पीएएस     - 2 नोव्हेंबर 1983
आरएएस   -  22 नोव्हेंबर 1973
एपीएस    -  27 नोव्हेंबर 1944
एडीएस    - 14 ऑगस्ट 1949
एमएलए   - 20 मे 1935
एनएमए    - 21 फेब्रुवारी1968
एमएमए    - 27 जून 1973