AC सारखा भिंतीवरही करता येतो फीट हा वॉटर एअर कुलर; AC सारखी देतो थंडी हवा, किंमतीत AC पेक्षा स्वस्त

दिव्य मराठी वेब टीम

Apr 03,2019 01:10:00 PM IST

गॅझेट डेस्क - सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारचे वाटर एअर कुलर मिळत आहेत. हे कुलर जास्त कुलिंगसोबत आता वेगवेगळ्या डिझाइनमध्ये उपबल्ध होत आहेत. सिम्फनी कंपनीचे Symphony हे एक असेच कुलर आहे. या कुलरचे वैशिष्ट्य म्हणजे याला AC प्रमाणे डिझाइन करण्यात आले आहे. तसेच AC प्रमाणे भिंतीवरही फिट करता येते. या कुलरची 200 स्वेअर फूट एरिया थंड करण्याची क्षमता आहे. यामध्ये एक वॉटर टँक देण्यात आले आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वॉटर टँक पूर्णपणे भरल्यानंतर किंवा रिकामे झाल्यानंतर अलार्म वाजतो. याची ऑनलाइन किंमत 13,449 आहे. आपण जर ACचा विचार केला तर 1 टन स्प्लिट AC ची किंमत किमान 25 हजारांपासून सुरु होते.

हे कुलर कसे काम करते हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पाहा...

X
COMMENT