आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरियात आयसिसच्या 3000 दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण; दोन दिवसांपासून सुरू होती धुमश्चक्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस - जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसच्या 3000 सदस्यांनी अमेरिका समर्थक सैनिकांसमोर आत्मसमपर्ण केले आहे. सीरियातील बेघूझ येथे गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेच्या नेतृत्वातील स्थानिक कुर्दिश सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू होती. संघर्षाच्या पहिल्याच दिवशी 400 दहशतवाद्यांनी शस्त्र टाकले. तर दुसरा दिवस निघाला तोपर्यंत आत्मसमर्पण करणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या 3000 पर्यंत पोहोचली. सीरियन डेमोक्रेटिक फोर्सेसचे प्रवक्ते मुस्तफा बाली यांनी ट्वीट करून यासंदर्भातील अधिकृत माहिती जारी केली.


सीरियाच्या बेघूझ गावात उद्ध्वस्थ झालेल्या दहशतवादी शिबीरांचे फोटो आणि व्हिडिओ माध्यमांवर दाखवले जात आहे. त्यामध्ये हजारो दहशतवाद्यांना कुर्दिश सैनिक अटक करत असतानाही दिसून येत आहेत. तीन दिवसांपूर्वी कुर्दिश सैनिक दहशतवाद्यांना संपवण्यासाठी या गावात आले होते. त्यावेळी स्थानिकांच्या घरांमध्ये लपलेल्या आयएसच्या सदस्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. कुर्दिश सैनिकांची मदत करण्यासाठी लढाऊ विमान सुद्धा गावांवरून फिरत होते. लष्करी कारवाई सुरू असताना हे विमान गावात दहशतवाद्यांच्या शिबीरांवर बॉम्ब सुद्धा टाकत होता. या संपूर्ण कारवाईला दहशतवादी घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी एकानंतर एक त्यांनी आत्मसमर्पण करण्यास सुरुवात केली. हजारो दहशतवाद्यांच्या अटकेनंतर कुर्दिशांनी घरांमध्ये जाऊन दहशतवाद्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी स्थानिकांकडून विरोध झाल्याचेही माध्यमांनी सांगितले आहे. 


ब्रिटनच्या एका मानवाधिकार संघटनेच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरपासून आतापर्यंत 60 हजार लोक आयसिसच्या तावडीतील गाव आणि शहर सोडून पसार झाले आहेत. या दरम्यान सैनिकांनी दहशतवाद्यांवर कारवाई करत असताना सैनिकांवर सुद्धा दहशतवादी हल्ले घडवण्यात आले. परंतु, आता सीरियात अवघ्या काही किलोमीटर क्षेत्रावर आयसिसचा ताबा आहे. त्यांना देखील उखडून फेकण्यासाठी मोहिमा राबवल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...