आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियन President असद यांच्या पत्नीला ब्रेस्ट कॅन्सर; फोटो पोस्ट करून केला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस - सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या पत्नीला स्तनांचा कर्करोग झाला आहे. सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो शेअर करून त्यांच्या उपचार संदर्भातील माहिती जारी करण्यात आली आहे. सीरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या आणि तेथेच वाढलेल्या असमा अल-असद यांनी 2000 मध्ये बशर अल असद यांच्याशी निकाह केला होता. असमा जगातील सर्वात वादग्रस्त प्रथम महिलांपैकी एक असून त्यांच्यावर 2012 मध्ये युरोपियन युनियनने निर्बंध लादले आहेत. 

 

उपचार शक्य
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये असमा अल-असद आपले पती बशर अल असद यांच्यासोबत रुग्णालयातील एका रुममध्ये बसलेल्या दिसून येतात. त्या फोटोवर दिलेल्या कॅप्शननुसार, असमा अल असद यांच्यावर प्राथमिक स्वरुपाचा उपचार सुरू आहे. त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे लवकर कळाले असून त्यावर उपचारही शक्य आहे. सीरियात सोशल मीडियावर त्यांचा हा फोटो व्हायरल होत आहे. सीरियन नागरिक त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा संदेश देत आहेत. 


लग्नानंतर राष्ट्राध्यक्ष बनले होते असद
बशर अल असद आणि ब्रिटिश-सीरियन दुहेरी नागरिकत्व असलेल्या असमा यांचा निकाह 2000 मध्ये झाला होता. त्यावेळी सीरियाच्या अध्यक्ष पदावर असद यांचे वडील हाफेज अल-असद होते. लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतच बशर अल असद यांनी वडिलांची जागा घेतली. तेव्हापासूनच तेच राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत. लग्नापूर्वी असमा लंडनमध्ये बँकर होत्या. तर असद राजकारणात येण्यापूर्वी एक डॉक्टर होते. फेब्रुवारी 2011 मध्ये व्होग मॅगझीनने असमा अल असद यांचा फोटो कव्हर पेजवर छापला होता. तसेच त्या सर्वात फ्रेश आणि आकर्षक फर्स्ट लेडींपैकी एक आहेत असा उल्लेख केला होता. 


पुढील स्लाइड्सवर, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...