आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाला प्रथमच न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकण्याची अाता संधी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन - मालिका विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता दाैऱ्यात न्यूझीलंडविरुद्धची टी-२० सिरीजही अापल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला अाहे. टीम इंडियाला अाता न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० च्या फाॅरमॅटमध्ये मालिका जिंकण्याची संधी अाहे. भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला अाज बुधवारपासून सुरुवात हाेत अाहे. मालिकेतील सलामीचा सामना वेलिंग्टनच्या मैदानावर अायाेजित करण्यात अाला. भारताने अातापर्यंत विदेश दाैऱ्यामध्ये ९ संघाविरुद्ध टी-२० मालिका खेळल्या. यातील अाठ संघांविरुद्धच्या मालिकामध्ये भारताला विजयी पताका फडकवता अाली. यामध्ये अाफ्रिका, श्रीलंका, झिम्बाब्वे, विंडीज, अाॅस्ट्रेलिया, इंग्लंड, अायर्लंडमध्ये हा मालिका विजय संपादन केला. मात्र, न्यूझीलंडमध्ये असा मालिका विजय मिळवता अाला नाही. त्यामुळे अाता भारताची नजर न्यूझीलंडमध्ये विक्रमी मालिका विजय संपादन करण्याकडे लागली अाहे. 

 

पराभवाची परतफेड करणार : २००९ मध्ये न्यूझीलंड संघाने टी-२० मालिकेत भारतावर २-० ने विजय संपादन केला हाेता. त्यामुळे अाता हा पराभवाचा वचपा काढण्यसाठी टीम इंडिया सज्ज झाला अाहे. सलगच्या मालिका विजयाने भारतीय संघ सध्या फाॅर्मात अाहे. 

 

१० वर्षांपूर्वी २००९ मध्ये न्यूझीलंडकडून टी-२० मालिकेत भारताचा २-० ने पराभव 
१२ वर्षांत न्यूझीलंडविरुद्ध अातापर्यंत दाेन विजय 

क्रिकेटच्या छाेट्या फाॅरमॅट टी-२० मध्ये भारताची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी अत्यंत सुमार ठरलेली अाहे. गत १२ वर्षांत भारत अाणि न्यूझीलंड यांच्यात एकूण ८ टी-२० सामने झाले अाहेत. यातील दाेनच सामन्यांत भारताला विजय संपादन करता अाला, तर सहा लढतींत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने अातापर्यंत अाॅस्ट्रेलिया अाणि श्रीलंका संघाविरुद्ध प्रत्येकी ११ सामने जिंकले. अाफ्रिकेविरुद्ध ८, इंग्लंडविरुद्ध ७, पाकिस्तानविरुद्ध ६ अाणि विंडीजविरुद्ध ५ सामने जिंकता अाले. अाता न्यूझीलंडविरुद्ध विजयाच्या रेकाॅर्डमध्ये प्रगती साधण्याचा संघाचा प्रयत्न असेल.
 
क्रमवारी  टाॅप-१२ मध्ये ११ स्पिनर, रशीद अव्वल 
अायसीसीच्या टी-२० क्रमवारीत गाेलंदाजांच्या यादीमधील टाॅप-१२ मध्ये ११ फिरकीपटूंचा समावेश अाहे. गत वर्षभरापासून फिरकीपटू अव्वल कामगिरी करत अाहेत. अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशीद खान हा अाठ सामन्यांत २२ विकेट घेऊन अव्वल स्थानावर अाहे. त्याचा स्ट्राइक रेट ९ असा अाहे. म्हणजेच प्रत्येक अाठव्या चेंडूवर त्याने एक गडी बाद केला. स्ट्राइक रेटच्या बाबतीत भारताचा कुलदीप यादव हा दुसऱ्या स्थानावर अाहे. त्याने प्रत्येक १० व्या चेंडूवर एक बळी घेतला. 

 

राेहितच्या नेतृत्वात ११ सामने जिंकले 
कर्णधार विराट काेहलीला विश्रांती देण्यात अाली. त्यामुळे त्याच्या जागी राेहित शर्माकडे टी-२० मालिकेसाठी टीमच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली. त्याच्या नेतृत्वात भारताची या फाॅरमॅटमधील कामगिरी काैतुकास्पद अाहे. राेहितने कुशल नेतृत्वात १२ पैकी ११ सामन्यांत विजयश्री खेचून अाणली. अाता सलामीच्या विजयाने त्याला काेहलीच्या कामगिरीशी बराेबरी साधता येईल. काेहलीने अातापर्यंत १२ विजय मिळवून दिले. यात धाेनी (४१ विजय) अव्वल अाहे. 

 

अाता क्रुणाल-हार्दिक साेबत खेळणार 
टी-२० मध्ये अाॅलराऊंडर क्रुणाल व ऋषभ पंतला संधी देण्यात अाली. पंत या फाॅरमॅटमध्ये अापल्या शैलीच्या बळावर सामन्याला कलाटणी देऊ शकताे, असे मत धवनने सामन्यापूर्वी मांडले. याशिवाय शुबमानचीही निवड करण्यात अाली. अाता क्रुणाल अाणि हार्दिक हे दाेघे पांड्या बंधू टी-२० सामन्यात साेबतच मैदानावर उतरणार अाहेत. त्यामुळे या दाेघांकडून टीमला मैदानावर अव्वल कामगिरीची अाशा अाहे. 

 

सर्वाधिक विकेट घेणारे टाॅप-५ फिरकीपटू गाेलंदाज 
गाेलंदाज संघ सामने विकेट 
शादाब पाक 21 28 
रशीद खान अफगाणिस्तान 8 22 
कुलदीप भारत 9 21 
यजुवेंद्र चहल भारत 13 18 
शाकिब बांगलादेश 11 15 

 

भारतीय महिलांचे टी-२० सामन्यांचे शतक ! 
भारतीय महिला संघ टी-२० सिरीजही नावे करण्यासाठी उत्सुक अाहे. यातून भारतीय महिलांना यशाचा दुहेरी याेग जुळवून अाणता येईल. भारतीय महिला यातून करिअरमध्ये टी-२० सामन्यांचे शतक पूर्ण करणार अाहे. यातून भारत हा १०० टी-२० सामने खेळणारा जगातील सहावा संघ ठरेल. भारत व न्यूझीलंड टी-२० सामन्यांच्या मालिकेला अाज बुधवारपासून सुरुवात हाेत अाहे. 
 

बातम्या आणखी आहेत...