आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोलकाता : ईडन गार्डन मैदानावर शुक्रवार गुलाबी चेंडूच्या अतिरिक्त स्विंगचा साक्षीदार झाला. मात्र फक्त बांगलादेशसाठीच. भारतीय फलंदाजांनी गुलाबी चेंडूच्या स्विंगचा यशस्वी सामना केला, मात्र बांगलादेशाचे सर्व १० गडी द्रुतगती गोलंदाजांनी पटकावले. भारतात प्रथमच गुलाबी चेंडूवर होत असलेल्या डे-नाइट कसोटी सामन्यात प्रथम खेळताना बांगलादेशचा डाव ३०.३ षटकांतच १०६ धावांवर आटोपला. भारताने दिवसअखेर ४६ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावा केल्या आहेत. कर्णधार कोहली (५९) आणि रहाणे (२३) खेळपट्टीवर आहेत.
कोहली सर्वात वेगाने ५००० धावा करणारा पहिला कर्णधार
विराट कोहली फलंदाजीच्या नव्या शिखरावर पोहोचला. ८६ डावांत ५००० धावा करणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रलियाच्या रिकी पॉन्टिंगच्या नावावर होता.
बांगलादेश सर्वबाद 106
भारत : 174/ 3
बांगलादेशचा डाव २ तास ३३ मिनिटांत आटोपला. चार खेळाडू शून्यावर आणि दोन खेळाडू एक धावेवर बाद झाले. फक्त तीन खेळाडूंनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. भारताचे तिन्ही बळी द्रुतगती गोलदांजांनी टिपले.
ईशांतचे १२ वर्षांनंतर मायदेशात ५ बळी
फक्त २२ धावा दिल्या या पूर्वी २००७ मध्ये पाकविरुद्ध ५ बळी घेतले होते. किफायतशीर गोलंदाजाच्या पंगतीत बुमराह नंतर तो दुसरा भारतीय ठरला.

प्रथमच विरोधी संघ सर्वात कमी षटकांत बाद
भारताने ३०.३ षटकांत बांगलादेशचा डाव गुंडाळला. २००५ मध्ये ४४.२ षटकांत झिम्बाब्वेच्या संघाला बाद केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.