आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • T20 World Cup: Mithali Raj's Superb Half century; India Won By Radha's Performance

टी-२० विश्वचषक: मिताली राजचे शानदार अर्धशतक; राधाच्या कामगिरीने भारत विजयी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुयाना - माजी कर्णधार मिताली राजच्या (५१) तुफानी फलंदाजीपाठाेपाठ राधा यादव (३/२५) दीप्ती शर्माच्या (२/१५) धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने गुरुवारी धडाकेबाज विजय मिळवला. भारताच्या महिलांनी अायसीसीच्या टी-२० विश्वचषकात विजयी हॅटट्रिक नाेंदवली. भारताने तिसऱ्या सामन्यात अायर्लंड संघावर ५२ धावांनी मात केली. या विजयासह भारतीय महिला उपांत्य फेरीत दाखल झाल्या.


प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने ६ बाद १४५ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात अायर्लंड महिला संघाला ८ गड्यांच्या माेबदल्याात ९८ धावांपर्यंत मजल मारता अाली.  संघाकडून जाॅयसीने  सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. 


गुरुवारी भारताचा उपांत्य सामना : अाठ वर्षानंतर भारताच्या महिलांनी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. अाता फायनलच्या तिकीटसाठी उत्सुक असलेल्या भारतीय महिलांचा उपांत्य सामना २२ नाेव्हेंबर गुरुवारी हाेणार अाहे. 

 

मितालीचे अर्धशतक; स्मृतीसाेबत भागीदारी
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने  झंझावाती खेळी करताना अर्धशतक ठाेकले. तिचे करिअरमधील १६ अर्धशतक ठरले. तिने ५६चेंडूंत  ४ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे ५१ धावा काढल्या. यासह तिने स्मृतीसाेबत अर्धशतकी भागीदारीही केली. 

 

राधा यादवची धारदार गाेलंदाजी;३ बळी
भारतीय महिला संघाच्या विजयात मिताली राजपाठाेपाठ युवा गाेलंदाज राधा यादवचे माेलाचे याेगदान राहिले. तिने धारदार गाेलंदाजी करताना ३ बळी घेतले.  यासह तिने अायर्लंडच्या महिला संघाचा विजयाचा प्रयत्न हाणुन पाडला. तसेच भारताकडून दीप्ती शर्माने २ अाणि  पुनम यादवने १ बळी घेतला. त्यामुळे टीमला विजय मिळवला. हा टीमचा सलग तिसरा विजय ठरला. 

बातम्या आणखी आहेत...