आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 रूपयांत 100 किमीचे मायलेज देणार ही बाइक, इतकी असू शकते किंमत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : पुणे येथील इलेक्ट्रिक मोटारसायकल स्टार्टअप कंपनी Tork Motors 100 किमीचे मायलेज देणाऱ्या गाडीची निर्मिती करत आहे. T6X असे या गाडीचे नाव ठेवण्यात आले आहे. दोन तासांमध्ये फुल चार्ज होणारी गाडी 5 यूनिट वीज खर्च करणार आहे. 5 रुपये प्रति युनीट प्रमाणे बाइकला चार्च करण्यासाठी 25 रूपये खर्च येणार आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर 100 किमीपर्यंतचे अंतर कापण्याची गाडीची क्षमता आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत सव्वा लाख रूपये असू शकते. याची टॉप स्पीड 100 kmph असणार आहे.  

 

देशातील पहिली इलेक्ट्रिक बाइक असणार T6X

मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली ही पहिलीच इलेक्ट्रिक मोटारसायकल असणार आहे. या गाडीचे काही फोटोज नुकतेच लॉन्च झाले आहेत. या फोटोमध्ये ही बाइक एखाद्या प्रीमियम बाइकसारखी दिसत आहे. तसेच लुकच्या बाबतीत Yamaha Fz, ajaj Pulsar NS200, TVS Apache RTR 200 4V या गाड्यांनी ती टक्कर देऊ शकते. पुणे येथील फॅक्ट्रीमध्ये या कारची निर्मिती होत आहे. या बाइकमध्ये 27 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करणाऱ्या 6 किलोवॅटच्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

 

2020 मध्ये लाँच होण्याची शक्यता

ही बाइक 2019 च्या शेवटी किंवा 2020 च्या सुरुवातीला भारतात लाँच करण्यात येऊ शकते. यामध्ये एलॉय व्हीलसहित डिस्क ब्रेक देण्यात येणार आहेत. याशिवाय यामध्ये स्मार्ट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. Tork T6Xची टेस्टिंग बाइक लीक झालेली आहे. फोटोवरून रायडिंग पोझिशन स्पोर्टी आणि आरामदायक असल्याचे दिसत आहे. 

बातम्या आणखी आहेत...