आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील अब्दुल म्हणजेच, शरद सांकला इंडस्ट्रीमध्ये 25 वर्षांपेक्षा अधिक काळापासून काम करत आहेत. पण अनेक शो आणि सुमारे 35 हून अधिक चित्रपट केल्यानंतरही त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला हे तुम्हाला माहिती आहे का. सध्या मुंबईत त्यांचे दोन रेस्तरॉ आहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी त्यांच्या स्ट्रगलबाबत सांगितले.
50 रुपये होती रोजची कमाई
शरद यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी सर्वप्रथम 1990 मध्ये 'वंश' चित्रपटात काम केले होते. त्यात त्यांची चार्ली चॅप्लिनची भूमिका केली होती. ती अगदी छोटी भूमिका होती. त्यावेळी मला रोजचे 50 रुपये मिळत होते. त्यानंतर मी 'खिलाडी', 'बाजीगर' आणि 'बादशाह' सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले. तरीही त्यानंतर मी आठ वर्षे बेरोजगार होतो.
काय केले आठ वर्षांत
शरद सांगतात, या आठ वर्षांत ते पोर्टफोलिओ घेऊन निर्मात्यांकडे अनेक चकरा मारत होते. नाव असूनही मला काम मिळाले नाही. पण मी मागे सरकलो नाही. मी असिस्टंट डायरेक्टर, कोरियोग्राफर आणि कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. काही कॅमिओही केली. पण मोठे काम मिळाले नाही. 9 वर्षांपूर्वी मी 'तारक मेहता...' जॉइन केले आणि मग मागे वळून पाहिले नाही.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अब्दुल म्हणजेच शरद यांच्याविषयी आणखी काही माहिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.