आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तारक मेहता'मधील रिटा रिपोर्टरच्या घरी लवकरच हलणार पाळणा, फ्लॉन्ट केले बेबी बंप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या  लोकप्रिय मालिकेत रिटा रिपोर्टर ही व्यक्तिरेखा साकारणारी  अभिनेत्री प्रिया आहुजा राजदा हिच्याकडे गोड बातमी असून लवकरच तिच्या घरी पाळणा हलणार आहे. प्रिया नऊ महिन्यांची गर्भवती असून ती प्रेग्नेंसीचा हा काळ भरपूर एन्जॉय करत आहे.

काही दिवसापूर्वी तिने आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. अलीकडेच प्रियाने पती मालवसोबत एक खास फोटोशूट केल आहे. या फोटोमध्ये तिचे बेबी बंप दिसून येत आहे. या फोटोशूटमध्ये प्रियाच्या चेह-यावर आई होणार असल्याचा आनंद स्पष्ट झळकतोय. 

काही दिवसांपूर्वीच तिच्या डोहाळे जेवणाचाही कार्यक्रम पार पडला होता. या सगळ्यांचे फोटो प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 

प्रियाचे लग्न गुजराती दिग्दर्शक मालव राजदा यांच्यासोबत झाले आहे. मालव राजदा हे ‘तारक मेहता उल्टा चष्मा’चे चीफ डायरेक्टर आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर प्रिया आणि मालवची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये लग्न थाटले.  

बातम्या आणखी आहेत...