Home | Business | Gadget | tablet-computer-will-be-cheaper

टॅबलेट कॉम्प्युटर मिळणार एकदम स्वस्त

वृत्तसंस्था | Update - May 19, 2011, 06:04 PM IST

आयपॅड आणि गॅलक्सीसारख्या महागड्या टॅबलेट कॉम्प्युटर्सना लवकरच पर्याय उपलब्ध होणार आहे.

  • tablet-computer-will-be-cheaper

    आयपॅड आणि गॅलक्सीसारख्या महागड्या टॅबलेट कॉम्प्युटर्सना लवकरच पर्याय उपलब्ध होणार आहे. बाजारात लवकरच स्वस्त टॅबलेट कॉम्प्युटर उपलब्ध कऱून देण्यात येणार आहेत.

    आयपॅड भारतात साधारणपणे ३० हजार रुपयांना मिळतो. त्याचवेळी सॅमसंगचा गॅलक्सी टॅबलेट २५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. पण आता भारतातील मोबाईल कंपन्यांनी यापेक्षा निम्म्या दरात टॅबलेट कॉम्प्युटर उपलब्ध करून दिले आहेत. लवकरच ते बाजारात दिसू लागतील.

    स्पाईस टेलिकॉम, भारती टेलिकॉम, कार्बन आणि लावा मोबाईल्स या कंपन्यांनी आता टॅबलेट कॉंप्युटर बाजारात आणण्याची तयार चालविली आहे. मोबाईल हॅण्डसेटच्या क्षेत्रात या कंपन्या नोकिया आणि सॅमसंग या कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहेत. या कंपन्यांचे मोबाईल हॅण्डसेट स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध होतात.

    स्पाइस टेलिकॉमच्या एक टॅबलेट कॉम्प्युटरची किंमत १५ हजार रुपये ठेवण्यात आलीये. त्याचवेळी दिल्लीस्थित लावा कंपनीने आपल्या टॅबलेटची किंमत १७-१८ हजारांच्या आसपास ठेवलीये. कार्बन मोबाईल पण याच पट्ट्यात टॅबलेट आणणार आहे. या वर्षी भारतात सात ते आठ लाख टॅबलेट विकले जातील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ज्या कंपन्यांना स्वस्तात टॅबलेट उपलब्ध करून देतील, त्यांनाच अधिक फायदा होईल, हे निश्चित.

Trending