आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताडोबात बफर झोनमध्ये मचाण पर्यटन पुन्हा सुरू, असे राहणार शुल्क

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पर्यटकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे मध्यंतरी बंद करण्यात आलेले ताडोब्यातील बफर झोनमधील मचाण पर्यटन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मोहर्ली व पळसगाव परिक्षेत्रांतर्गत प्रत्येकी दोन ठिकाणी हे पर्यटन राहणार आहे. मचाण पर्यटनात पर्यटकांना एका जिप्सीने सफारी केली जाईल. त्यानंतर मचाणवर बसून पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. यासाठी पर्यटकांना दोन दिवसांपूर्वी बुकिंग करणे अनिवार्य आहे. 

 

पर्यटकांना या दरम्यान व्याघ्रदर्शनाचाही आनंद मिळतो. मचाण पर्यटनासाठी प्रथम पर्यटकांना सहमती पत्र लिहून देणे आवश्यक करण्यात आले आहे. दरम्यान, मचाण पर्यटनासाठी वन विभागाद्वारे तयार केलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. पर्यटनाच्या वेळी मचाणवर बसण्यापूर्वी औषधी सामग्री, पाणी स्वतः आणणे गरजेचे आहे. मचाणवर बसण्याची जबाबदारी स्वतःची राहील. आवश्यक साहित्य सतरंजी, बेडशीट, चादर आणणे गरजेचे आहे. मोठ्या आवाजात बोलणे व गप्पा मारणे, वाद्य वाजविणे, मचाणवरून खाली उतरणे, केसांना सुगंधित तेल व कपड्यांना सुगंधित द्रव्य लावून मचाणवर बसण्यास मनाई आहे. मचाण पर्यटन करताना मचाणवर धूम्रपान व मद्यपान करण्यावर सक्त मनाई असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. प्लास्टिक बॅग, कचरा करण्यास मनाई आहे. दरम्यान, मचाणवर जास्तीत जास्त दोन व्यक्ती व एक गाइड राहू शकतील. 

 

असे राहील शुल्क 
- मचाण प्रवेश शुल्क : दीड हजार रुपये 
- जिप्सीसाठी : ६५० रुपये 
- गाइड शुल्क : ३५० रुपये 
- कालावधी : सकाळी ५.३० ते ९.३० वा. 

बातम्या आणखी आहेत...