• Home
  • Gossip
  • Tahir Kashyap's silence on the selection of Madhuri Dixit in her film, Tahira can direct a web series made on Ayushmann's book

Bollywood / माधुरी दीक्षितच्या निवडीवर ताहिरा कश्यपने का बाळगले मौन ? आयुष्मानच्या पुस्तकावर बनणाऱ्या वेब सिरीजचे दिग्दर्शन करू शकते ताहिरा  

ताहिराच्या चित्रपटात काम करत असल्याचे माधुरीने स्वत: सांगितले होते 

दिव्य मराठी वेब टीम 

May 25,2019 05:11:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा ताहिरा कश्यपला कॅन्सर डिटेक्ट झाला होता तेव्हा ती आपल्या आगामी चित्रपट 'शर्मा जी की बेटी'च्या प्री प्रॉडक्शनवर काम करत होती. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरपासून सुरू करण्याचे तिने ठरवले होते. मात्र, शस्त्रक्रियेमुळे ते पुढे ढकलत गेले. आता मात्र चित्रपट शूटिंगसाठी सज्ज असताना ताहिराने अजून याच्या तारखा सांगितल्या नाहीत. शिवाय तिने अजून शीर्षकदेखील सांगितले नाही आणि कलाकारांची यादीही लपवत आहे. एवढेच नव्हे, तर तिने अजून माधुरी दीक्षितच्या नावाची घाेषणाही केली नाही. माधुरीने स्वत: ताहिराच्या चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले होते.

काय म्हणाली होती माधुरी...
एका मुलाखतीत माधुरी म्हणाली होती..., ताहिरा कश्यपच्या चित्रपटात जे पात्र आहे ते करण्यासाठी मी उत्सुक आहे. तिने जे पात्र रचले आहे ते मजेदार आहे, लोकांना प्रेरित करेल.

काय म्हणते ताहिरा ?
माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहे का? असे जेव्हा ताहिराला विचारले तेव्हा ती म्हणाली..., ही कल्पना आहे. मी तर माधुरी मॅमचे नाव अनाउन्स केले नव्हते आणि टीमच्या लोकांनीदेखील केले नाही. सध्या तर मी याच्या कलाकारांची निवड करत आहे.

कलंकमुळे तर नव्हे ?
तथापि, या प्रकरणात ट्रेड पंडितांचे म्हणणे आहे की, यामागे कदाचित 'कलंक'चे फ्लॉप होणे असेल. चित्रपट आपटल्यामुळे माधुरीला या चित्रपटातून वगळले असावे.

ताहिरासोबत झालेली बातचीत
हा चित्रपट स्लाइस ऑफ लाइफ ठरेल का?
आजचे मुद्दे मांडायला मला आवडते. मी जास्त चित्रपट पाहिले नाहीतर त्यामुळे मी यावर कॉमेंट करू शकत नाही. हो, मात्र इम्तियाज अलीसारखी कथेवर चित्रपट करणे मला आवडते.

चित्रपटाच्या कथेविषयी काही सांग ?
सध्या मी स्क्रिप्ट्स आणि नवीन ड्राफ्ट्स बनवण्याची तयार करत आहे. आम्ही सध्या तरी अधिकृत घोषणा करणार नाही. फक्त एवढेच सांगेन की, माझा चित्रपट पाच वेगवेगळ्या युवतींच्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारा आहे. यातून लाेकांचे मनोरंजन होईल.

या चित्रपटात पति आयुष्मान आणि दीर अपारशक्ति घेणार का ?
अपार आणि आयुष्मान दोघांचा मी खूप आदर करते. आयुष्मान थिएटरमध्ये माझे सिनियर आहेत. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मला खूप शिकावे लागेल. अपारदेखील माझा सिनियर आहे. त्याने बऱ्याच वेब सिरीज केल्या आहेत. मात्र दोघांना एकत्र आणू शकेल अशी माझ्याकडे एकही स्क्रिप्ट नाही.

आयुष्मानच्या पुस्तकावर बनणार वेब सिरीज, ताहिरा करू शकते दिग्दर्शन...
आयुष्मान खुराणाचे सेमी-बायोग्राफिकल पुस्तक 'क्रॅकिंग द कोड'वर वेब सिरीज बनू शकते. हे पुस्तक आयुष्मानने २०१५ मध्ये पत्नी ताहिरासोबत मिळून लिहिले होते. या पुस्तकात आयुष्मानने सामान्य माणूस ते चित्रपटात येण्यापर्यंतची कथा लिहिली होती. या पुस्तकाचे अधिकार रोडीज फेम रघुरामने विकत घेतले आहेत आणि ते यावर वेब सिरीज बनू इच्छित आहेत. सूत्रानुसार, ताहिराने या चित्रपटाचे दिग्दर्शन करावे, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. कारण ती स्वत: सहलेखक आहे आणि आयुष्मानची पत्नी आहे. मात्र, जेव्हा याविषयी तिला विचारले तर तिने यालादेखील नकार दिला.

X
COMMENT