आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : भारताचा प्रथम विश्वकप जिंकण्याच्या कहाणीवर आधारित चित्रपट '83' मध्ये कपिल देव म्हणून रणवीर सिंहच्या लुकची चर्चा तर सध्या खूप होत आहे. पण या चित्रपटात सुनील गावस्कर बनलेला ताहिर राज भसीननेदेखील स्वतःला महान फलंदाजाच्या रोलमध्ये फिट बसवण्यासाठी खूप मेहनत केली आहे. स्वतः ताहिर राज भसीनने आम्हाला आपल्या या तयारीबद्दल माहिती दिली.
तो म्हणाला, "मला गावस्कर सरांची स्टाइल अडॉप्ट करण्यासाठी विशेष ट्रेनिंग घ्यावी लागली. कित्येक मुलांप्रमाणे मीही केवळ मनोरंजन म्हणून गल्ली क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे मला लवकरच या गोष्टीची जाणीव झाली की, वास्तवात गेम खेळणे आणि महान सुनील गावस्कर बनणे किती आव्हानात्मक असणार आहे. जेव्हा मी माझे क्रिकेट कोचिंग सुरु केले, तेव्हा मला जाणीव झाली की, ज्याप्रकारे मी क्रिकेट बॅट पकडत आहे, ते टेक्स्ट बुक फॉर्म नव्हते. खेळण्याची योग्य पद्धत शिकण्यासाठी मला सहा महिन्यांच्या या ट्रेनिंगमधून जावे लागले."
'मी फील्डवर स्ट्रगल करत नव्हतो.'
ताहिर पुढे म्हणाला, "या सहा महिन्यांच्या ट्रेनिंगने मला सहज खेळणाऱ्या प्रोफेशनल क्रिकेटरसारखे मोल्ड व्हायला मदत मिळाली. कॅमेरा मला शूटदरम्यान कॅप्चर करत होता. तर मी फील्डवर स्ट्रगल करताना दिसत नव्हतो. एका प्रोफेशनल फलंदाजाप्रमाणेच आपले शॉट्स खेळू शकत होतो."
कशी होती ही ट्रेनिंग...
- ट्रेनिंग सेशंसमध्ये पोहनेही सामील केले.
- आठवड्यातील तीन दिवस वेट ट्रेनिंग केली गेली.
- प्रोफेशनल बॅट्समन सारखे दिसण्यासाठी सलग बॅटिंग प्रॅक्टिस करून घेतली गेली.
- कोचने विशेषतः ताहिरचे पेशन्स लेव्हल वाढवण्यावर जोर द्यायला सांगितले.
कुणी करून घेतले ट्रेनिंग...
माजी भारतीय क्रिकेटर बलविंदर संधू आणि फिटनेस कोच राजीव मेहराने ताहिरची बॉडी लँग्वेज योग्य करण्यासाठी आणि त्याला गावस्कर यांची बॅटिंग स्टाइल शिकवण्यासाठी त्याच्यासोबत 6 महिने काम केले आहे. त्यानंतरच तो गावस्करप्रमाणे शॉट खेळण्याच्या स्थितीमध्ये येऊ शकला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.