आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कँसरचा सामना करत असलेल्या आयुष्मान खुरानाच्या पत्नीने टॉपलेस होऊन दाखवली सर्जरीची जखम, म्हणाली - सर्व डाग माझ्यासाठी सन्मानाप्रमाणे आहेत 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप कँसरचा सामना करतेय. वर्ल्ड कँसर डेला तारिहाने आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक फोटो शेअर करुन एक पोस्ट लिहिली आहे. या फोटोमध्ये ताहिरा बाल्ड लूकमध्ये दिसतेय. तिने आपल्या बॉडीच्या बॅक साइडचा फोटो शेअर केला आहे. यावर सर्जरीचे व्रण दिसत आहे. फोटोसोबत ताहिराने एक भावुक पोस्ट लिहिली आहे. ताहिराने लिहिलेली पोस्ट कँसरचा सामना करणा-या लोकांसाठी प्रेरणादायक आहे. ताहिराला जीरो ग्रेड ब्रेस्ट कँसर झाला आहे. 

 

सर्व डाग माझ्यासाठी सन्मानाप्रमाणे आहेत 
वर्ल्ड कँसर डे, हा माझा दिवस आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तुम्ही कँसर संबंधीत लोकांविषयीचे गैरसमज दूर करत हा दिवस साजरा कराल अशी आशा आहे. वास्तवात मी माझ्या सर्व डागांना जवळ करते कारण ते माझ्यासाठी सन्मानाप्रमाणे आहेत. आयुष्यात अनेक वेळा असे होते की, आपण खुप मागे जातो. पण आपण कमीत कमी एक पाऊल किंवा अर्धे पाऊलतरी पुढे टाकण्याची गरज असते. ताहिराने लिहिले की, - हा फोटो मी शेअर केला कारण मी या आजाराशी लढण्याचा हिंमत तुम्हाला दाखवू शकेल. या आजाराचे सेलिब्रेशन करणे हा माझा उद्देश नाही तर आजाराचा सामना करण्याचा आत्मविश्वास तुम्हाला दाखवणे हा आहे. याची जाणिव मला झाली आहे. 

 

सोनाली म्हणाली - डोके लपवल्याने काहीच होणार नाही 
तर कँसरचा सामना करणा-या सोनाली बेंद्रेनेही वर्ल्ड कँसर डेला एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. सोनालीने लिहिले की, - C शब्द ऐकताच सर्वांच्या मनात भीती निर्माण होते. या आजाराशी लढण्यासाठी एक खास दिवस का? पहिले मी या आजाराला खुप घाबरले होते. पण नंतर विचार केला की, डोके लपवून घेतल्याने तुम्ही परिस्थितीचा सामना करु शकत नाही. मला सर्वांना एकच म्हणायचे आहे की, हे एका नकारात्मक विचाराविरुध्द लढा नाही, तर रोज नव्या आशेने आयुष्य जगण्याची लढाई आहे. 

 

कामावर परतली सोनाली बेंद्रे 
यापुर्वी एका पोस्टमध्ये सोनालीने लिहिले होते की, "दिर्घकाळानंतर कामावर परतण्याची फिलिंग खुप वेगळी असते. पुन्हा एकदा कॅमेरासमोर येऊन कसे वाटले हे मी व्यक्त करु शकत नाही. मी गेल्या एक वर्षापासून खुप उदास होते, पण आता कमावर परतून खुप छान वाटतेय. मला जे करायचे आहे ते मी करु शकते याचा मला जास्त आनंद होतोय." सोनालीने पुढे लिहिले की, 'अजून लढाई संपलेली नाही. पण मला खुप आनंदी राहायचे आहे.' काही महिन्यांपुर्वी सोनाली अमेरिकेत कँसरवर उपचार करुन परतली आहे. तिला हाय ग्रेड कँसर झाला होता. 


 

बातम्या आणखी आहेत...