आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Taimur Ali Khan And Aamir Khan's Son Celebrates Krushn Janmashtami Festival By Breaking Dahihandi

एकीकडे तैमूर अली खान तर दुसरीकडे आमिर खानच्या मुलाने फोडली दहीहंडी, व्हिडीओज होत आहेत व्हायरल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णजन्माचा दिवस. या दिवसाला गोकुळाष्टमी, जन्माष्टमी अशी अनेक नवे आहेत. याचदिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात. अनेक राज्यांमध्ये जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून त्यातील दही आणि लोणी सर्वांना प्रसाद म्हणून वाटले जाते. अशातच तैमूर अली खान कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने बहीण इनाया नौमी खेमूसोबत दिसला. पहिल्यांदा करिना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका तैमूर मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये दहीहंडी फोडताना कैद झाला. तैमूर आणि इनायाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 

 

आमिरचा मुलगा आझादने वडिलांच्या पाठीवर उभे राहून फोडली दहीहंडी...  
कृष्ण जन्माष्टमीच्या विशेष प्रसंगी आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मुलगा आझादसोबत दहीहंडी फोडताना दिसत आहे. हा व्हिडीओ आमिर खानच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये मुलगा आझाद आमिरच्या पाठीवर चढून हंडी फोडत आहे. तसेच आमिर खानची पत्नी किरण राव मोबाइलमध्ये दोघांचा हा क्यूट व्हिडीओ बनवत होती. तसेच याच्याशी निगडित आमिर खानने एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यामध्ये आझाद आमिरच्या पाठीवर चढलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.’

बातम्या आणखी आहेत...