Home | Gossip | taimur ali khan is going to patoudi with his parents

रेड कॅप, ब्लू शर्ट घालून वडिल सैफच्या खांद्यावर बसून पटौदीला जाण्यासाठी निघाला 2 वर्षांचा तैमूर, सोबत आई करिना कपूरदेखील होती, व्हायरल होता हे व्हिडीओ 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 11, 2019, 12:43 PM IST

कधी सीरियस तर कधी कॅमेरामांकडे पाहून हात दाखवत होता तैमूर... 

 • taimur ali khan is going to patoudi with his parents

  एंटरटेनमेंट डेस्क : करिना कपूर आणि सैफ अली खान त्यांचा मुलगा तैमूर अली खानसोबत पटौदीला रवाना झाले. एयरपोर्टवरून तिघांचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तैमूर रेड कलरची कॅप आणि ब्लू शर्टमध्ये वडिलांच्या खांद्यावर बसलेला दिसला. यादरम्यान तैमूर कधी सोबत चालणाऱ्या लोकांना आश्चर्याने पाहत होता तर कधी कॅमेरामॅनला हात दाखवत होता तैमूर. एवढेच नाही तैमूर थोड़ास सीरियसदेखील दिसला. करीनाने अशातच फिल्म 'गुड न्यूज' चे शूटिंग पूर्ण केले आहे. आता ती 'तख्त' आणि 'अंग्रेजी मीडिया' चे शूटिंग सुरु करणार आहे. यापूर्वी तिला फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम घालवायचा होता. यासाठी फॅमिलीसोबत पटौदीला गेली आहे. करिना यादरम्यान लाइट पिंक रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये दिसली.

  तिच्या हातात होती लेदर बॅग...
  तैमूर प्ले स्कूलला जातो. किड जिम कम स्कूलची 3 महिन्यांची फीस 15,000 रुपये आहे म्हणजेच प्रत्येक महिन्याचा चार्ज 5,000 रुपये आहे. खास गोष्ट ही आहे की, मुलांच्या या शाळेत आठवड्यात केवळ एकच दिवस क्लास असतो. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी खूप सारे इक्यूप्मेंट्स आहेत.

  एवढी आहे तैमूरच्या एका फोटोची किंमत...
  सैफ अली खानने 'कॉफी विद करन' सांगितले होते की, त्याच्या आणि करिनाच्या मुलाच्या एका फोटोची 1500 रुपये आहे. सैफनुसार, फोटोचा इतका रेट एखाद्या सुपरस्टारचा देखील नाहीये. तैमूरचे फोटोज इतके महाग असल्याचे कारण त्याची क्यूटनेस आहे.

Trending