Home | Gossip | taimur ali khan new video viral

कारमधून उतरताच करिनच्या मुलाने नॅनीचा हात सोडला, स्वतः पळाला आणि ईतरांनाही आपल्यामागे पळवले, व्हायरल झाला व्हिडीओ, एका यूजरने दिला सल्ला - ऐश्वर्याच्या मुलीने तैमूरकडून काही शिकायला हवे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 11, 2019, 03:39 PM IST

मुलामुळे खूप ट्रोल झाली होती करिना, मग दिले होते सडेतोड उत्तर...

 • taimur ali khan new video viral

  एंटरटेनमेन्ट डेस्क - करिना कपूरचा मुलगा तैमूर जसा घराच्या बाहेर पडतो तसे त्याचे फोटो घेण्यासाठी मिडीया फोटोग्राफर तयार असतात. तैमूर रोजच्यासारखाच फिरायला निघाला होता. त्याने कारच्या बाहेर पडताच आधी नॅनीचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात तो नॅनीचा हात सोडवून पळाला. त्याला पळताना पाहून त्याच्या तिन्ही केअर टेकरलाही त्याच्यामागे धावावे लागले. यावेळी तैमूर खूपच मस्तीच्या मूडमध्ये होता. त्याच्यासोबत तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य देखील होता. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यावर एका यूजरने कमेन्टमध्ये लिहीले, ऐश्वर्याची मुलगी आराध्याने तैमूरकडून काही शिकायला हवे.

  याचप्रमाणे इतर यूजर्सच्याही कमेन्ट आहेत...
  - एक यूजर म्हणाला, 'नॉटी टिम टिम' तर एक जण म्हणाला, 'पळवले नॅनीला' दूसऱ्याने लिहीले, 'कदाचित याने भागमभाग फिल्म पाहिली आहे' आणखी एकाने लिहीले, 'जनता याच्यामागे पागल आहे'.
  - तैमूरला अशा पद्धतीने मिळणाऱ्या अटेंशनमुळे करिना परेशान आहे. तीचे म्हणणे आहे की, अशा अटेंशनमुळे त्याला बाकीच्या मुलांसारखे नॉर्मल आयुष्य जगता येत नाहीये.

  तैमूरमुळे ट्रोल झाली होती करिना...
  काही दिवसांपूर्वी करिनाला तैमूरमुळे ट्रोल केले गेले. ट्रोलर्सचे म्हणणे होते की, नॅनीच्या भरवश्यावर न सोडता आईच्या नात्याने करिनाने स्वतः तैमूरची काळजी घेतली पाहिजे. करिना ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली होती, 'अशा लोकांसाठी माझ्या डोक्यात नेहमी एक बोट असते'.

  आठवड्यातून एकदाच शाळेत जातो तैमूर...
  तैमूर प्ले स्कूलमध्ये जातो. या किड जिम कम स्कूलची 3 महिन्याची फीस 15,000 आहे म्हणजे एका महिन्याचा चार्ज 5,000 रुपये आहे. खास गोष्ट ही आहे की, मुलांच्या शाळेत केवळ एकच दिवस क्लास असतो. इथे मुलांना खेंण्यासाठी आणि शिकण्यासाठी खूप सारे इक्विपमेंट्स आहेत.

Trending