Home | Gossip | Taimur Ali Khan's video from the set of 'Jawani Jaaman' going viral, seen having fun with father Saif ali khan

'जवानी जानेमन' चित्रपटाच्या सेटवरून समोर आला तैमूर अली खानचा व्हिडीओ, वडिल सैफसोबत मस्ती करताना दिसला 

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 23, 2019, 06:21 PM IST

तैमूरसोबत आई करिनाही होती 

  • Taimur Ali Khan's video from the set of 'Jawani Jaaman' going viral, seen having fun with father Saif ali khan


    एंटरटेनमेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या आपला आगामी चित्रपट जवानी जानेमन च्या शूटिंगसाठी मध्ये आहे. तसेच करिना कपूर तैमूर अली खानदेखील त्याच्यासोबत आहेत. तैमूर अली खान जिथे जातो तिथे मस्ती केल्याशिवाय कसा राहणार. या सेटवरही काही असेच झाले.

    पिंकव्हिलाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, सैफ अली खान आपला आगामी चित्रपट 'जवानी जानेमन' चे शूटिंग करत होता. त्याचवेळी त्याला भेटण्यासाठी करिना कपूर आणि तैमूर अली खान पोहोचले. वडिलांना पाहून तैमूर खूप खुश झाला आणि त्याला सोडताच नव्हता. तसेच करिना कपूरदेखील त्यांच्या आसपासच होती. एवढेच नाही तर तैमूर वडिल सैफला पाहून आनंदाने नाचतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये तैमूर अली खान वडिल सैफसोबत मस्ती करताना दिसत आहे.

Trending